आता अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदयनराजे करणार "ओपन हार्ट सर्जरी'?

आता अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदयनराजे करणार "ओपन हार्ट सर्जरी'?
Updated on

सातारा : विषय तहकुबीनंतर नगराध्यक्षा माधवी कदम आणि नगरसेवक वसंत लेवे यांनी एकमेकाच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतल्यामुळे सातारा विकास आघाडीतील "आरोग्य' काही जणांमुळे बिघडल्याचे समोर आले. आघाडीचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी आता खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरोनाकाळात सर्वसामान्यांची अडवणूक करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची "ओपन हार्ट सर्जरी' करणे आवश्‍यक असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

तब्बल एक वर्षानंतर पालिकेची सभा बुधवारी पार पडली. सभेपुढे मांडण्यात आलेल्या पत्रिकेत कोरोना कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी केलेल्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्याच्या विषयाचा समावेश होता. नेमक्‍या याच विषयाला नगरसेवक लेवे यांनी हरकत घेत टिपण्या सादर करण्याची मागणी सभागृहात केली. टिपण्यांबरोबरच आरोग्य विभागाचे सुहास पवार गैरहजर असल्याने तो विषय सभागृहाने तहकूब केला. विषयाच्या तहकुबीनंतर नगराध्यक्षा कदम यांनी पत्रक काढत नगरसेवक लेवेंच्या कारभारावर आक्षेप घेतला. त्या पत्रकाला आव्हान देणारे पत्रक काढत नगरसेवक लेवे यांनी नगराध्यक्षा कदम यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. दोन्ही बाजूंनी झालेल्या आरोपांमुळे आरोग्य विभागाचे "आरोग्य' पाहुण्यारावळ्यांच्या नेमणुकांमुळे बिघडल्याचे समोर आले. 

कोरोना कालावधीत या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफरी, अडवणूक झाल्याच्या सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकू येत असत. मात्र, त्याकडे अनेकांनी सोयीने दुर्लक्ष केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राबवायच्या उपाययोजनांसाठी आवश्‍यक असणारा निधी स्थानिक पातळीवर खर्च करण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर त्याचा सोयीचा अर्थ लावत तशा साहित्याची मुक्‍तहस्ते खरेदी पालिकेच्या आरोग्य विभागाने केली. याच खरेदीच्या मुद्यावर नगरसेवक लेवे यांनी बोट ठेवल्याने तो विषय तहकूब करण्यात आला. यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. पुण्याई संपल्याचे सांगत नगरसेवक लेवे यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला नगराध्यक्षा कदम यांनी दिला. यामुळे संतापलेल्या नगरसेवक लेवे यांनी त्याच प्रकारचे उत्तर देत नगराध्यक्षा कदम यांना आव्हान दिले. आव्हान-प्रतिआव्हानामुळे सातारा विकास आघाडीतील "आरोग्य' आरोग्य विभागाच्या कार्यपध्दतीमुळे बिघडल्याचे समोर आले आहे. 

उदयनराजेंसमवेतच्या निर्णयावर शिवेंद्रसिंहराजे ठाम

लेवे यांची "आरोग्य'वर पकड 

"आरोग्य' हा वसंत लेवे यांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. या विभागावर लेवे यांची पहिल्यापासून पकड होती. ती पकड ढिली करण्याचे काम काहीजणांनी अत्यंत खुबीने केले. एक घाव आणि दोन तुकडे, या धोरणासाठी लेवे यांची ख्याती आहे. त्यांनी या विभागातील अनागोंदीचे पुरावे असल्याचे जाहीर केले आहे. या पुराव्यांवर जाहीर चर्चा होणे आवश्‍यक आहे.

भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सातारकरांना उदयनराजेंनी भुलवले : नगरसेवक अशोक मोने

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.