Satara : मावळ्यांनी केली यशस्वी दुर्ग चढाई

साताऱ्यातील शिवराष्ट्र ट्रेकर्सचे यश; किल्ले अलंग- कुलंग सर
दुर्ग चढाई
दुर्ग चढाईsakal
Updated on

नागठाणे : ट्रेकर्सना आव्हान ठरणारे, अत्यंत कठीण श्रेणीत गणले जाणारे अलंग, मदन अन् कुलंग हे किल्ले साताऱ्यातील मावळ्यांनी सर केले. त्यात ‘शिवराष्ट्र ट्रेकर्स’च्या सदस्यांनी या किल्ल्यांवर यशस्वी चढाई केली.

सह्याद्री म्हणजे आसमंताला भिडलेली उंचच उंच शिखरे, खोलच खोल दऱ्या, काळजाचा ठोका चुकविणारे कोकणकडे. याच सह्याद्रीतील अत्यंत खडतर दुर्ग त्रिकुट म्हणजे अलंगगड, मदनगड अन् कुलंगगड. सह्याद्रीच्या कळसूबाई डोंगररांगेतील हे किल्ले समुद्रसपाटीपासून चार हजार ८०० फूट उंचीवर आहेत.

इथे पर्वतारोहण करताना मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने सुरक्षेची खात्री करण्यासाठी वापरावी लागतात. अलंगवर २५ अन् ५० फुटांचा रॉक पॅच आहे. मदनवर ४० फुटांचा रॉक पॅच आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीचे आव्हान ‘शिवराष्ट्र ट्रेकर्स’चे मावळे सचिन सावंत, उद्धव पवार, राजेश पवार, सुनील माने, धारेश्वर तोडकरी, अभिजित भोसले यांनी पेलले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक युवक नामदेव बांडे, यातील बांडे यांचीही तांत्रिक मदत अन् सहकार्य लाभले.

अलंग, मदन अन् कुलंग किल्ल्यांची मोहीम खडतर मानली जाते. त्यात एखादी साधी चूकही साक्षात मृत्यूला कवटाळण्यासारखी ठरते. मात्र, मोठ्या मेहनतीने ‘शिवराष्ट्र ट्रेकर्स’नी ती यशस्वी केली.

सचिन सावंत, कोरेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.