Satara : कऱ्हाड उत्तरने भाजपचा आमदार द्यावा

आमदार जयकुमार गोरे; करवडीत संवाद यात्रेदरम्‍यान राष्ट्रवादीवर टीकेची झोड
satara
satarasakal
Updated on

कऱ्हाड : कऱ्हाड उत्तरमध्ये गेल्या अडीच वर्षांत तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून अनेक जण भाजपची विचारधारा स्वीकारत आहेत. इथल्या जनतेने आता भाकरी फिरवून कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारा भाजपचा आमदार निवडून द्यावा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीतही भाजपचा झेंडा फडकवा, असेही आवाहन त्यांनी केले.

करवडी येथे आयोजित संवाद यात्रा मेळाव्यात ते बोलत होते. युवा नेते धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास जाधव, सागर शिवदास, भीमराव पाटील, सुरेश पाटील, महेश जाधव, महेंद्र डुबल, दीपाली खोत, सुजाता जाधव, चंद्रकांत मदने, प्रमोद गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कधीच कुणाशी विश्वासाने वागले नाहीत.

जिल्ह्याने त्यांची पाठराखण केली. मात्र, त्यांनी जिल्ह्याला काहीच दिले नाही. जिल्ह्याचे मेडिकल कॉलेज रखडवले, जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातले. अनेक वर्षे कऱ्हाड उत्तरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी पालकमंत्र्यांनी हणबरवाडी-धनगरवाडी योजनेसह अनेक विकासकामे केली नाहीत. शेतकऱ्यांच्या यातना त्यांना माहिती नाहीत. त्यांनी सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना त्रास द्यायचे काम केले. यापुढे कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. उत्तरमधील पाणी योजना भाजपच पूर्ण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.