सातारा : जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. आपल्या देशातही या साथीचा प्रसार होत असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त आहे. सातारा जिल्ह्यासह सातारा शहरातही आता कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. गेले दोन- तीन महिने लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत होवून लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र लोकांना गांभिर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून विनाकारण फिरणे, गर्दी करणे अंगलट येत आहे. स्वत:ला मर्यादा घालून स्वयंशिस्त न पाळल्यास कोरोनाचे संकट अधिक गढद होणार असून तसे झाल्यास पुन्हा स्वत:हून लॉकडाऊन ओढावून घ्यावा लागेल, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जनतेला दिला आहे.
कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. ही साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. कोरोना साथीला आळा घालण्यासाठी संपुर्ण देशात दोन ते तीन महिने लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद होती. छोटे- छोटे उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने हजारो- लाखो लोकांचे जगणे मुश्किल झाले होते. हातावर पोट असणार्या असं'य लोकांची उपासमार होत होती. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र गेल्या आठ- दहा दिवसांत सातारा जिल्हा आणि सातारा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच असून ही मोठी चिंताजनक बाब आहे. नागरिक स्वत: मर्यादा पाळत नाहीत, स्वत:ची काळजी घेत नाही, हे महत्वाचे कारण म्हणावे लागले.
बाजारपेठ उघडी आहे, मार्केट खुले आहे म्हणून विनाकारण अनेक लोक ङ्गिरतात, गर्दी करतात. मला काय होणार नाही या भ'मात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे, असे प्रकार अनेक लोकांकडून होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वाढती रुग्णसं'या आहे. कोरोना आपल्या दरवाजात येवून पोहचला आहे. आतातरी जागे व्हा. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल, अशी कळकळीची सुचना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांना केली आहे. कोणीही विनाकारण बाहेर ङ्गिरु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा ङ्गैलाव आटोक्यात येईल. याची खबरदारी सर्वांनीच घेणे बंधनकारक आहे. वाढती रुग्णसं'या चिंताजनक बाब आहे. कोरोनाचा फैलाव रोखायचा असेल तर प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. स्वत:च स्वत:ची काळजी घेतली पाहिजे तरच कोरोनापासून बचाव होणार आहे. रुग्ण संख्या वाढतच राहिली तर मात्र पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे आणि हा लॉकडाऊन स्वत: लोक ओढावून घेणार आहेत. पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थती नको असेल तर, लोकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि कोरोनपासून स्वत:चे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी विनाकारण बाहेर फिरु नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेला केले आहे.
सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार या याेजनेचा मोफत लाभ
फलटण शहर : निंबळकमध्ये महिलेचा खून
पोवई नाक्यापर्यंत सर्व काही अतिक्रमण समजावे का? उदयनराजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.