मतदारसंघातील आरोग्य सेवेबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नाराजी

आरोग्‍य सेवेबाबत नाराजी
आरोग्‍य सेवेबाबत नाराजी
Updated on

सातारा : सोमर्डी आरोग्य केंद्रामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी ठेवा. रुग्णांना तातडीची आणि चांगली सेवा द्या, अशा सक्त सूचनाही त्‍यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांना केल्या आहेत. 

भोगवली मुरा येथील एका मुलाला सर्पदंश झाला. त्याला ग्रामस्थांनी तातडीने सोमर्डी आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिथे उपचारासाठी टाळाटाळ झाली. बेजबाबदारपणे साताऱ्याला घेऊन जाण्यास सांगितले. मुलाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला प्राण गमवावे लागले. सोमर्डी आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतात. त्याठिकाणी मनमानी सुरू असून, आरोग्य केंद्राचा रुग्णांना काहीही फायदा होत नाही, अशा तक्रारी सोमर्डी ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन डॉ. गडीकर यांची भेट घेतली आणि चर्चा केली. 

या वेळी जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, संदीप परामणे, जयदीप शिंदे, सोमर्डीचे सरपंच संतोष शेलार, रवी परामणे, बामणोलीचे सरपंच पांडुरंग तरडे, आखाडेचे सरपंच ज्ञानेश्‍वर शेलार, मनोज परामणे, समीर आतार आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

आरोग्य केंद्र ही त्या भागातील लोकांची तातडीची आरोग्य सेवा देण्यासाठी आहेत. मात्र, रुग्णांवर वेळेत उपचार होत नसतील, तर आरोग्य केंद्रांचा उद्देश काय, असा प्रश्‍न शिवेंद्रसिंहराजे यांनी केला, तसेच सोमर्डी आरोग्य केंद्रात तातडीने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचना डॉ. गडीकर यांना केली. कोणताही रुग्ण उपचाराविना राहू नये, याची खबरदारी घ्यावी, अशी सक्त सूचना केली. डॉ. गडीकर यांनी सोमर्डी आरोग्य केंद्रातील रिक्त जागांवर तातडीने अधिकारी, कर्मचारी नियुक्त करून त्यांना पूर्णवेळ हजर राहण्याबाबत सूचना देतो, असे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.