सातारा : कोरोना व इतर कारणांमुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले आहे. या परिस्थितीचा विचार करत यंदाचा अर्थसंकल्प कोणताही करवाढ नसलेला मांडण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात साताऱ्याच्या सर्वांगीण विकासाचे प्रतिबिंब उमटल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
कदम म्हणाल्या,"" गेली चार वर्षे सातारा शहराचा विकास सातारा विकास आघाडी पालिकेच्या माध्यमातून करत आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा आमच्या कार्यकारिणीचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. गेल्या चार वर्षांत खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नामुळे शहराच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लागले आहेत. ऑफलाइन सभेस परवानगी नसल्याने अर्थसंकल्पीय सभा ऑनलाइन घेण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत अर्थसंकल्पीय वाचन सुरू असताना त्यावर नोंदविलेल्या विरोधी गटाच्या हरकती दूर करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पातून सातारकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
शेंडे म्हणाले, ""सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. शहराचा विकास करत असतानाच राजवाडा येथे आर्ट गॅलरी उभारणे, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे, शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक उभारणे आदी महत्त्वाकांक्षी योजनांना अर्थसंकल्पामुळे चालना मिळणार आहे. याचबरोबर हद्दवाढीनंतर पालिकेत आलेल्या शाहूपुरी, विलासपूर व इतर भागांच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात या विस्तारित भागात पायाभूत आणि प्रशासकीय सुविधा उभारण्यावर पालिकेचा जोर राहणार आहे.'' सर्वसामान्य सातारकरांना नजरेसमोर ठेवत हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून, त्यातील तरतुदींचा कोणताही बोजा त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पडणार नसल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
FasTag : आनेवाडी टोलनाक्यानजीक वाहनधारकांची खुलेआम लूट
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.