जिल्ह्यात 'सुकन्या'तून 1,189 नवीन खाती; टपाल विभागाची 21 गावांत विशेष मोहीम

जिल्ह्यात 'सुकन्या'तून 1,189 नवीन खाती; टपाल विभागाची 21 गावांत विशेष मोहीम
Updated on

सातारा : टपाल विभागाच्या वतीने नोव्हेंबर महिना हा "सुकन्या समृध्दी योजना' म्हणून घोषित करण्यात आला होता. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार 189 मुलींची खाती उघडण्यात आल्याची माहिती टपाल विभागाने दिली. 

सुकन्या समृध्दी योजनेच्या माध्यमातून दहा वर्षांच्या आतील मुलींची खाती उघडण्यात येतात. त्यामध्ये टपाल विभागाने नोव्हेंबरमध्ये विशेष मोहीम राबवत जिल्ह्यातील सात विभागांतील 21 गावांची निवड केली होती. या गावांत जास्तीत-जास्त खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठवण्यात आले होते. या मोहिमेत सातारा पूर्व विभागात पाडळी, कुमठे, तासगाव, सातारा पश्‍चिम विभागात खेड, केळघर, अंबवडे, कऱ्हाड पश्‍चिम विभागात चोरे, पेरले, विहे, वाई विभागात भिलार, सोनगाव, गुळुंब, कऱ्हाड पूर्व विभागात गोवारे, मुंढे, कोडोली, फलटण विभागात राजुरी, सांगवी, विडणी, वडूज विभागात जाखणगाव, अंभेरी, पडळ या गावांचा समावेश करण्यात आला होता. या गावांमध्ये नोव्हेंबरमध्ये राबविलेल्या मोहिमेत 546 मुलींच्या नावाने खाती, तर संपूर्ण जिल्ह्यात एक हजार 189 खाती उघडण्यात आली. पुढील काळातही जास्तीत-जास्त खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.