कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे अन्य प्रश्न मार्गी लावण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावे. एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सातारा जिल्ह्यांतील लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिले.
कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, तर व्हीसीद्वारे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर उपस्थित होते.
ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! अमेरिका- भारताचे मैत्रीचे नाते अतूट राहिल; नौदलाने गाण्यातून केला विश्वास व्यक्त
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ""राज्याच्या विकासात कोयना धरणाचे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे बघितलं जातं. या धरणासाठी प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम कालबद्ध पद्धतीने 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात यावे. पात्र, प्रकल्पग्रस्तांना सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया महाराष्ट्र दिनापासून सुरू करावी.''
Video पाहा : तुमचे वय 45 पेक्षा जादा आहे? मग जाणून घ्या लसीकरणाच्या नाेंदणीची पध्दत
विशेष बाब म्हणून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आयटीआय प्रमाणपत्रधारक पाल्यांना महावितरणमध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्त आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना राबविण्यात याव्यात. या माध्यमातून तेथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.