मोरगिरी (जि. सातारा) : गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधण्याकरिता शासन शेतकऱ्यांना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध करून देते. मात्र, पाटण पंचायत समितीच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी या चांगल्या योजनेला खो बसला आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घरफळा भरला नसल्याचे कारण देत इच्छुकांना दाखले देत नसल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यापासून लाभार्थी वंचित राहात आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यात शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.
पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा पशुपालन हा मुख्य व्यवसाय बनलेला आहे. अर्थाजनाचे प्रमुख साधन म्हणून हा व्यवसाय येथील लोकांचा आधार बनला आहे. डोंगरपठारसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध असल्याने पूर्वीपासूनच लोक याकडे जोडधंदा म्हणून पाहत आले आहेत. घरे बांधतानाही जनावरांच्यासाठी एक सोपा काढला जात असल्याचे सर्रास चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळते.
गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधण्याकरिता शेतकऱ्यांनी पाटण पंचायत समितीमधून प्रकरण करण्यासाठी अर्ज आणले आहेत. तर काही अंशी प्रकरणेही दाखल करण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घरफळा वसूल करण्यात व्यस्त आहेत. कोरोना काळात वसुली झाली नसल्याने त्यांनी वसुली मोहीम जोरात राबवली आहे. घरफळा भरल्याशिवाय कुणालाही कसलीही कागदपत्रे, दाखले द्यायचे नाहीत, असा दंडक घालून घेतला आहे. तर बहुतांशी ग्रामसेवकांना या योजनेबाबत कल्पना नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दाखले देण्यास सर्रास टाळाटाळ केली जात आहे. पाटण पंचायत समितीच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी या चांगल्या योजनेला खो बसला असल्याचे विदारक चित्र पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.
गाय व पक्का गोठा बांधकाम करण्यासाठी लाभार्थीच्या जागेचा 8 अ चा किंवा सात-बारा उतारा, लाभार्थ्यांचा जात प्रवर्ग दाखला, लाभार्थीची निवड केलेला ग्रामसभा ठराव, सदर काम ग्रामपंचायतीच्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ठ असल्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला, लाभार्थी जॉबकार्ड, पशुवैद्यकीय अधिकारी यांचा जनावरांच्या संख्येचा दाखला. कमीत कमी दोन जनावरे आवश्यक, लाभार्थी अल्पभूधारक असल्याचा तलाठी यांचा दाखला. लाभार्थ्याची बॅंक पासबुक झेरॉक्स, लाभार्थ्याचे रेशनिंग कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड, मतदान कार्ड, यापूर्वी सदर कामाचा लाभ न घेतलेबाबतचा तलाठी यांचा दाखला या कागदपत्रांची आवश्यकता असून, शासनाच्या निकषांमध्ये गोठा बांधकाम पूर्ण करण्याचे आहे.
शेळी गटवाटप योजनेतील इच्छुकांची तारांबळ
दरम्यान, मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर देण्यात येणाऱ्या शेळी गटवाटप योजनेची मुदत तीन दिवसांनी संपणार आहे. त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार करणार नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. 20 शेळ्या व दोन बोकड असा शेळी गटवाटप करणे याकरिता दोन लाख 29 हजार 400 रुपये एका शेळी गटाची किंमत असून, सर्व प्रवर्गासाठी अनुदान एक लाख 14 हजार 700 रुपये देय असणार आहे. मात्र, या प्रकरणी शेवटच्या टप्प्यात अर्ज मिळाल्याने इच्छुकांची तारांबळ उडाली आहे.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.