शिरवळकरांचा भाजपच्या सरपंचांवर 'विश्वास'; राष्ट्रवादीसह विरोधी गटाची 714 मतांनी धोबीपछाड

शिरवळकरांचा भाजपच्या सरपंचांवर 'विश्वास'; राष्ट्रवादीसह विरोधी गटाची 714 मतांनी धोबीपछाड
Updated on

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळच्या सरपंचांवर अविश्वास प्रस्तावावर झालेल्या मतदान प्रक्रियेत भाजपच्या सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीसह विरोधी गटाची त्यांनी 714 मतांनी धोबीपछाड केली. निकाल जाहीर झाल्यानंतर काल सायंकाळी भाजपने शिरवळ शहरात मिरवणूक काढली. 

शिरवळच्या सरपंचपदाची नोव्हेंबर 2017 मध्ये थेट सरपंच निवडणूक झाली होती. त्या वेळी भाजपच्या लक्ष्मी पानसरे निवडून आल्या. मात्र, बहुमत भाजपला गाठता आले नव्हते. त्यानंतर डिसेंबर 2019 ला विरोधी गटाकडून सरपंचांवर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. त्यानंतर कोरोना काळामुळे ही प्रक्रिया वर्षभरानंतर या आठवड्यात ग्रामसभेचे मतदान घेण्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यायानुसार राज्य निवडून आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. शुक्रवारी तालुक्‍यात प्रथमच ग्रामसभेद्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 11 हजार 974 मतदारांपैकी केवळ चार हजार 614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी झालेल्या मतमोजणीत अविश्वास ठरावाच्या बाजूने एक हजार 867 मते पडली, तर अविश्वास ठरावाच्या विरोधात दोन हजार 581 मते पडली. त्यामुळे सरपंचांवरील अविश्वास ठराव 714 मतांनी फेटाळला गेला. 166 मते अवैध ठरली. चार हजार 448 मते वैध ठरली. 

दरम्यान, ज्ञानसंवर्धिनी शाळेत झालेल्या मतदानास सकाळी मतदारांची गर्दी होती. त्यानंतर मतदारांचा ओघ ओसरला. मात्र, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व इतर पक्षांतील तालुक्‍यातील प्रमुख मंडळींनी दिवसभर हजेरी लावली. हे नेते प्रत्येक मतदाराची विचारपूस करताना दिसत होते. पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार दशरथ काळे, नायब तहसीलदार वैभव पवार, पोलिस निरीक्षक हजारे हे दिवसभर संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेऊन होते. 

राष्ट्रवादीला विचार करायला लावणारा निकाल 
हा निकाल भाजपच्या गोटात गेल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धक्का पोचणारा ठरला आहे. सध्या जिल्हा परिषदचे अध्यक्षपद व पंचायत समिती सभापतिपद हे शिरवळमध्ये आहे. त्यामुळे हा निकाल राष्ट्रवादीला विचार करणारा लावणारा ठरला आहे, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.