हेळवाकला कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्ग रोखल्याने 32 जणांवर गुन्हा; नागरिकांत संताप

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News
Updated on

कोयनानगर (जि. सातारा) : कऱ्हाड ते चिपळूण मार्ग खड्डेमुक्त करावा, या मागणीसह अनेक वेळा आंदोलन करूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या यंत्रणेच्या विरोधात कोयना विभागातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी हेळवाक येथे कऱ्हाड ते चिपळूण राज्यमार्ग अर्धा तास रोखला. या वेळी झालेल्या रास्ता रोकोतील आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी अखेर धरपकड केली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, पाटण पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय 32 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कऱ्हाड ते चिपळूण राज्यमार्गाची दयनीय अवस्था आहे. हा मार्ग खड्डेमुक्त करावा, यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली, तरीही त्याची दखल घेतली जात नव्हती. महिन्यापासून सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनामुळे हेळवाक येथे पावणेबाराच्या सुमारास सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने या आंदोलनाकडे कानाडोळा केल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यांनी तेथेच बसण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. 

पाटणचे पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, कोयनानगरचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकात माळी यांनी पोलिस बळाचा वापर केला. त्यात 32 आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आंदोलनाचे निमंत्रक संपत जाधव, भाजपचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, मनसेचे कोयना विभागाध्यक्ष दयानंद नलवडे, बाळासाहेब कदम, बापू देवळेकर, नेचलचे सरपंच रामभाऊ मोहिते, रमेश जाधव, पंकज गुरव, सीताराम कदम, समर्थ चव्हाण उपस्थित होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.