Satara News: सातार्‍यातील दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांची चिंता मिटली; देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

मुंबई- सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.सातार्‍यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित आहेत अशा भागांना याचा मोठा फायदा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीस म्हणाले की, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारने मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. (krishna river water planning for drought prone area)

Devendra Fadanvis
ITMS System : पुणे-सातारा महामार्गही होणार ‘इंटेलिजंट’; ‘आयटीएमएस’ यंत्रणा करणार कार्यान्वित

सातार्‍यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते, त्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे पाणी उलपब्ध होणार आहे. 2 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्त्वे 4 तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadanvis
Next CM of Maharashtra: ना फडणवीस, ना शिंदे; मुख्यमंत्री होणार तर फक्त...; अनिल देशमुखांचा मोठा दावा

यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे.सातारा जिल्ह्यातील विशेषत: या तालुक्यांमधील शेतकर्‍यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो!, असंही फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.