साताऱ्यात शनिवार, रविवारी कडक निर्बंध; काय सांगतो जिल्हाधिकाऱ्यांचा 'आदेश', वाचा सविस्तर..

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, तरी नागरिकांनी योग्य कारण असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

शनिवार व रविवार बाहेर फिरण्यावर बंदी असून योग्य कारणाने बाहरे पडल्यास नागरिकांना कारण विचारण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमधल्या ज्या-ज्या बाबी आहेत, त्या शनिवार व रविवारीसुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरु राहणार आहेत. तसेच 30 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा जमावबंदी आदेश आठवड्याच्या 7 दिवसांसाठी लागू राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योगही 7 दिवस सुरु राहणार आहेत. शिफ्टमध्ये काम करतात अशा उद्योगातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीचे फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवावे त्यांना शनिवार व रविवारी कामावर जाण्यासाठी अडविणार नाही. रेस्टॉरंट व बारमध्ये सोमवार ते शुक्रवार पार्सल सेवा सुरु होती. मात्र, शनिवारी व  रविवारी ही पार्सल सेवा घ्यायला नागरिकांना बाहेर पडता येणार नाही, परंतु रेस्टॉरंट व बार यांना घरपोच सेवा देता येऊ शकते. 

ई-कॉमर्स, शेती संबंधित कामांना बंधने नाहीत. लग्न समारंभासाठी तहसीलदार याची परवानगी घ्यावी. 50 पेक्षा जास्त लोकांनी लग्न समारंभास उपस्थित राहू नये. कोणी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याचे ग्रामीण भागातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून सामाजिक संस्थांनी यासाठी मदत करावी. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद आहेत, अशा दुकानदांरानी यापूर्वी जसे सहकार्य केले होते, त्याचप्रमाणे यावेळी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीरचा वापर प्रोटॉकॉलप्रमाणेच करावा

रेमडेसिवीरचा औषध हे कोरोना संसर्ग रुग्णाच्या नातेवाईकांच्या दबावाखाली दिले जात आहे. तसे न करता डॉक्टरांनी प्रोटॉकॉलप्रमाणे रेमडेसिवीरचे औषध द्यावे. जिल्ह्याला रेडिमसनचा पुरवठा 100 टक्के होईल व रुग्णांना सहजरित्या उपलब्ध होईल यासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या माध्यतातून प्रयत्न करीत आहोत.  रेमडेसिवीरच्या औषधाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये. गरज असेल तर कोरोना संसर्ग रुग्णास डॉक्टर रेमडेसिवीरच औषध देतील. रेमडेसिवीरच्या औषधासाठी लवकरच कक्ष स्थापन करुन या कक्षाच्या माध्यमातून निरासन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.