सामान्य जनतेवर 'मार्च एंड'चे संकट; कर्ज परतफेडीसाठी संस्थांकडून तगादा

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

रहिमतपूर (जि. सातारा) : कोरोनाच्या संकटात छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यवसाय, रोजगार ठप्प असल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या सर्वसामान्य जनतेवर आता "मार्च एंड'चे संकट घोंगावत आहे. समाजातील प्रतिष्ठा वाचवण्याचे प्रयत्नात सर्वसामान्य वर्ग तणावात जात असल्याची स्थिती आहे. 

कोरोना महामारीच्या संकटात हातावरच्या पोट असणारे छोटे- मोठे उद्योगधंदे असणाऱ्यांचे कंबरडे मोडले. बॅंका, महावितरण, नगरपालिकांनी वसुली थांबवली होती. त्यामुळे सामन्यांना दिलासा मिळाला होतो; परंतु आता "मार्च एंड'मुळे सर्व यंत्रणांकडून एकदम तगादा लावल्याने कुठून पैसे द्यायचे या विचारात सामान्य नागरिक आहेत. जेमतेम रोजगार उपलब्ध झाल्याने संसाराचा गाडा पटरीवर आणण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या मध्यमवर्गींची धडपड सुरू आहे. 

महावितरणकडून दहा ते बारा महिन्यांचे बिल एकदम भरण्यास सांगण्यात येत असून, तसे न केल्यास वीज कनेक्‍शन तोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी न भरल्यास नळ कनेक्‍शन तोडणे, दुकाने सील करणे, त्याचबरोबर थकबाकीदारांचे नावे बाजारपेठेत फ्लेक्‍सवर प्रसिद्ध करणे यासारख्या कारवाई सुरू आहेत. बॅंका व पतसंस्थांनीही ग्राहकांकडे कर्ज परतफेडीसाठी तगादा लावला आहे. या सर्व स्थितीला सामोरे जाताना सर्वसामान्य वर्गाची दमछाक होत आहे. या सर्वांना पैसे द्यायचे कोठून या विचारात सर्वसामान्य आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.