महाबळेश्वर (जि. सातारा) : स्वच्छता अभियानात अव्वल आलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या डेपोवर टाकण्यात आलेला ओला कचरा हा जंगलातील प्राण्यांबरोबरच पाळीव गाईंसाठी जीवघेणा ठरत आहे. ओल्या कचऱ्याबरोबरच प्लॅस्टिकही या गाई खात आहेत. यापैकी अनेक गाईंचे दूध महाबळेश्वरकरांच्या घरात पोचत आहे. या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे.
शहरापासून काही किलोमीटर अंतरावर पालिकेचा कचरा डेपो आहे. पालिकेकडून ओला व सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. परंतु, टाकताना तो एकाच जागेवर टाकला जातो. ओल्या अथवा सुक्या अशा कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. रोज कित्येक टन जमा होणारा कचरा डेपोवर गोळा केला जातो. या ठिकाणी टाकण्यात येणारा ओला कचरा हा जंगलातील प्राण्यांचा पशुपक्ष्यांचे तसेच या परिसरातील पाळीव गाईंचे खाद्य बनले आहे. हा कचरा खाऊन अनेक गाईंचा मृत्यू झाला आहे. अशा घटना वरचेवर येथे घडत असतात. आजही येथे मोठ्या प्रमाणावर मोकाट गाई या ठिकाणी कचरा खाण्यासाठी गोळा होतात. त्यातील अनेक गाईंना विविध व्याधींनी पछाडलेले आहे तर, अनेक गाई या मृत्यूशी झुंज देत आहेत.
कचऱ्यावर प्रक्रिया करणारे युनिट पालिकेने बसविले आहे. परंतु, हे युनिट गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद पडले आहे. बंद स्थितीत राहिल्याने युनिटमधील साहित्य गंजले आहे, सडले आहे. पालिकेने नवीन युनिट बसविले आहे. परंतु, ते चालू करण्यासाठी पालिकेला मुहूर्त सापडत नाही. त्यामुळे पालिका नेमके काय काम करते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घनकचरा व्यवस्थापनावर पालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. हा खर्च नेमका कशावर खर्च होतो, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
फलटणात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेंपोवर पोलिसांचा छापा; 17 लाख मुद्देमालासह 36 जनावरे ताब्यात
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.