व्यायामशाळेसाठी 55 ग्रामपंचायतींना मिळणार 2.80 कोटींचा निधी; युवकांत आवड निर्माण करण्यासाठी उपक्रम

Satara Latest Marathi News Satara News
Satara Latest Marathi News Satara News
Updated on

सातारा : ग्रामीण भागातील युवकांत व्यायामाची आवड निर्माण व्हावी व नवीन पिढी तंदुरुस्त राहावी, यासाठी जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतींना व्यायामशाळा उभारणी व दुरुस्तीसाठी नियोजन समितीतून तब्बल दोन कोटी 80 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 46 ग्रामपंचायतींना दोन कोटी 39 लाख रुपये व्यायामाचे साहित्य खरेदी व नव्याने व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी हा निधी उपयोगात आणता येणार आहे. 

ग्रामीण भागात सध्या जीम उभारणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. या आधुनिक जीम सध्या तरुणाईला आकर्षित करू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांतील व्यायामाविषयीची गोडी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजन समितीतून निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच आमदारांनी सुचविलेल्या ग्रामपंचायतींना व्यायामशाळा उभारणी व साहित्य खरेदीसाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावोगावी आता सुसज्ज अशा व्यायामशाळांची उभारणी होणार आहे. नियोजन समितीतून व्यायामशाळांचे बांधकाम व साहित्य खरेदीसाठी 46 ग्रामपंचायतींना तब्बल दोन कोटी 38 लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच या कामांना गती येणार आहे. यामध्ये साहित्य खरेदीसाठी साडेतीन लाख रुपये तर व्यायामशाळा बांधकामासाठी सात लाख रुपयांचा समावेश आहे. 

तालुकानिहाय व्यायामशाळा व साहित्य खरेदीसाठी निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायती अशा-कोरेगाव तालुका : पवारवाडी, दुर्गळवाडी, गुजरवाडी, नवलेवाडी. खटाव तालुका : मुसांडवाडी व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी साडेतीन लाख रुपये. व्यायामशाळा बांधकामासाठी सात लाख रुपये निधी उपलब्ध होणारी गावे-कऱ्हाड तालुका : हरपळवाडी, मसूर, तासवडे, माळवाडी, खराडे, कोणेगाव, गायकवाडवाडी, अंतवडी, बेलवडे ब्रुदुक, धावरवाडी, चोरे, सावरघर, कारिवळे, करवडी, हजारमाची, वाठार किरोली, वडोली, नडशी, बाबरमाची, चिखली, खालकरवाडी. सातारा तालुका : मांडवे, अतित, भैरवगड, जांभगाव, नागठाणे, खोडद, पाडळी, निनाम. कोरेगाव तालुका : आर्वी, दुर्गळवाडी, कण्हेरखेड, अंभेरी, न्हावी, पवारवाडी. खटाव तालुका : वडगाव जयराम स्वामी, उंचीठाणे, शेनवडी, रेवली. 

आमदारांनी सुचवलेले प्रस्ताव... 

दरम्यान, आमदारांनी सुचविलेल्या आणि क्रीडा अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आलेल्या नऊ ग्रामपंचायतींसाठी 42 लाख रुपयांच्या व्यायामशाळांसाठी साहित्य खरेदीचाही यामध्ये समावेश केलेला आहे. यामध्ये महाबळेश्‍वर येथील अंजुमन खैरूल इस्माइल उर्दू हायस्कूल, सैनिक स्कूल सातारा, तसेच ग्रामपंचायत नागेवाडी, वालुथ, नायगाव, नवमहाराष्ट्र विद्यालय बिदाल, पेठ शिवापूर ग्रामपंचायत, खराडे आणि आटके ग्रामपंचायतींना साडेतीन लाख रुपये व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी एकूण 42 लाख रुपयांची रक्कम प्रास्तावित करण्यात आली आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.