Video : कोरोनासह जलप्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरीच असे करा "श्रीं'चे विसर्जन

Video : कोरोनासह जलप्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरीच असे करा "श्रीं'चे विसर्जन
Updated on

सातारा : श्रद्धा, परंपरा या असल्याच पाहिजेत; पण त्या जीवघेण्या ठरणार नाहीत, याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे. किंबहुना ती काळाची गरज असून, लाखो लोकांच्या जिवावर उठलेल्या "कोरोना'ला रोखण्याबरोबरच आपण सारेजणच वर्षानुवर्षे करत असलेले जलप्रदूषण टाळण्यासाठी समस्त नागरिकांनी आता गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच बादली, बकेट, टबमध्ये करण्याची गरज आहे. 

गेले पाच ते सहा महिने समस्त नागरिक कोरोना विषाणूच्या सावटाखाली आहेत. नागरिकांच्या हालचाली, वावरण्यावरही मर्यादा आल्या. मृत्यूची झडप कोठून कधी येईल, हे सांगता येत नाही. आजही या परिस्थितीत बदल झालेला आहे, असे म्हणता येणार नाही. पण, संकटाच्या सततच्या सावटामुळे कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या भीतीबाबत काहिसे बेदरकार झाल्याचे जाणवू लागले आहे. पण, असे करून चालणार नाही. समस्त नागरिकांच्या जीवन- मरणाच्या प्रश्नासाठी आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. गणेशोत्सवाने ती संधी दिली आहे. गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करून कोरोनाला रोखण्याबरोबर जलप्रदूषण टाळता येणार आहे.

साताऱ्यातील कोरोना रुग्णालये समस्यांच्या विळख्यात; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे  

गर्दी...कोरोना अन्‌ नागरिक 

कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नाही. रोगावर औषध नसेल तर रोग टाळणे, रोग होऊ नये यासाठीची दक्षता घेणे हा सर्वांत चांगला उपाय असतो. यासाठीच प्रशासन सातत्याने एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवा, मास्क सतत वापरा, हात स्वच्छ धुवा, शक्‍यतो प्रवास टाळाच, सॅनिटायझर वापरा अशा सूचना देत आहे. कोरोनाचा येथे शिरकाव झाल्यानंतर महिनाभर नागरिकांनी सूचना गांभीर्याने घेतल्या. मात्र, हळूहळू त्यामध्ये शिथिलता येत गेली. त्याचाच परिणाम आपण भोगत आहोत. आता गेले आठवडाभर दररोज 400 ते 500 कोरोनाबाधित होत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. कोरोनावर औषध नसले तरी आपण सोशल डिस्टन्सिंगने त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकतो.

आम्हांला हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरु करु द्या : सातारा टुरिझम असोसिएशन 

आपण सारे उत्सवप्रिय 

आपण सारेजणच मुळात उत्सवप्रिय आहोत. त्यात सण, उत्सवाला काही कमी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सण-समारंभ गेले काही महिने साधेपणाने केले; पण आता नागरिकांचे भान सुटू लागले आहे. सण अंगात संचारू लागले आहेत. गणेशोत्सवासाठीच्या खरेदीसाठी सर्वत्र बाजारपेठेत नागरिकांनी केलेली गर्दी त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आता काही दिवसांत गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी नागरिक झुंडीने जातात, हे टाळणे नक्कीच आपल्या हातात आहे. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिक नद्या, तलावांवर मोठी गर्दी करतात. त्यातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो. तो टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव, हौदांचे नियोजन केले आहे. मात्र, यामुळे जलप्रदूषण काहिसे टाळता येणार आहे. पण, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. 

उज्ज्वला मोटेंना भला माणूस पुरस्कार 

घरीच करा मूर्ती विसर्जन 

गणेशमूर्तींचे घरीच बादली, टबमध्ये विसर्जन केले तर नदी, तलावांतील पाण्याचे प्रदूषण टाळण्याबरोबरच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे मोठे कार्य होणार आहे. गणेशमूर्तींचे चांगले विसर्जन व्हावे, ही प्रत्येकाची इच्छा असते, हे योग्यही आहे. पण, त्यासाठी जलाशयावर जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. घरीही सोप्या घरगुती पद्धतीने मूर्तीचे पूर्ण विसर्जन करता येते. कोरोनाचा प्रसार आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे.

दंतचिकित्सकांच्या सेवेबाबत उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश 

...असे करा मूर्तीचे घरीच विसर्जन 

गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करणे अगदी सोपे आहे. Sodium bicarbonate (खाण्याचा सोडा) आणि ammonium bicarbonate जे कोणत्याही खताच्या दुकानात सहज उपलब्ध होते. त्याचा यासाठी वापर करावा. गणेशमूर्ती पूर्ण बुडेल एवढे पाणी बकेटमध्ये घेऊन त्यामध्ये गणेशमूर्तीचे वजन आहे तेवढा खाण्याचा सोडा घालावा आणि त्यामध्ये मूर्ती विसर्जन करावे.
 
Sodium bicarbonate वापरले असेल तर साधारण चार दिवस मूर्ती विरघळण्यासाठी वेळ लागतो.  Ammonium bicarbonate वापरले असेल तर साधारण दोन दिवस मूर्ती विरघळण्यासाठी वेळ लागतो, असे सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील प्रा. डॉ. अनिता माळी यांनी सांगितले. 

Edited By : Siddharth Latkar



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.