'सामान्य जनतेने निवडणुक हातात घेतल्याने आम्हीच जिंकू'

suresh bhosale
suresh bhosalesystem
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखन्याच्या निवडणुकीसाठी (krishna sugar factory election) विद्यामान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसेले, (suresh bhosale) अतुल भोसले (atul bhosale) यांनी अर्ज दाखल केले. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या बहुतांशी उमेदवारांचे आज (साेमवार) अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सभासद साथ देतील, असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. (satara-news-krishna-sugar-factory-election-jayantrao-atul-suresh-bhosale-form-filled)

डॉ. भोसले म्हणाले, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे जवळपास सर्व अर्ज भरून झाले आहेत. मागील वेळी सभासदांनी आमच्या पॅनेलला निवडून दिले होते. याही वेळी आम्हाला विश्वास आहे. सभासदांनी निवडून दिल्यानंतर सहा वर्षात सभासदांच्या अपेक्षांच्या पूर्तीचे काम आम्ही केले आहे. ऊस दर, ऊस तोडून नेणे, ऊस पिकाच्या आधुनिकीकरण, ऊस विकास कार्यक्रमासह अनेक उपक्रम सहा वर्षात आम्ही राबवले आहेत. तोच विकासात्मक कार्यक्रम घेवून सभासदांसमोर जातो आहोत. त्यात आम्हाला यश येणार आहे.

suresh bhosale
काेराेनाची परिस्थिती तुमच्यामुळे हाताबाहेर गेली; खापर आमच्यावर

अतुल भोसले म्हणाले, जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी उमेदावारी अर्ज दाखल केला आहे. आमच्या पॅनेलचे सर्व संभाव्य उमेदवारही अर्ज दाखल करत आहेत. मागील सहा वर्षात जयवंतराव भोसले पॅनेलने कृष्णा कारखान्यात चांगले काम केले आहे. सभासदांच्या विश्वासाला पात्र राहुन काम करणारे पॅनेल म्हणून जयवंतराव भोसले सहकार पॅनेलकडे पाहिले जाते. त्यामुळे सभासद मोठ्या मताधिक्क्याने निवडणुकीत सहकार पॅनेलचा विजय करतील. तो विजय सभासदांचा असणार आहे. सामान्य जनतेने निवडणुक हातात घेतली आहे. त्यामुळे विरोधकांनाही नेमकी काय भुमिका घ्यावी, त्याचा निर्णय सहा महिन्यापासून घेता आलेली नाही.

लोकांचा कल विकासाच्या बाजूने, निस्वार्थीपणे कारखान्याचे हित बघणाऱ्यांच्या बाजूने आहे. त्यांनाच निवडून देण्याची सभासदांची भुमिका असल्याचा अंदाज आल्याने विरोधकांना नेमकी भुमिका घेता आलेली नाही, ते वास्तव आहे. मात्र तरीही विकासाच्या अजेंडा घेवून समोरे जायचे आहे. येणाऱ्या पाच वर्षात सहकार पॅनेल निवडून दिल्यानंतर सभासदांसाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करणार आहोत. हाच अजेंडा आहे. कोरोनाच्या संकट काळात निवडणुक होत असल्याने सर्वांनी जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.

suresh bhosale
Video पाहा : आईपणाची ऊब देणाऱ्या नर्स !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.