नव्या वर्षात लेटलतिफांचे वाजतगाजत स्वागत; मुख्याधिकाऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल

नव्या वर्षात लेटलतिफांचे वाजतगाजत स्वागत; मुख्याधिकाऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : पालिकेच्या अधिकारीस कर्मचाऱ्यांनी वेळेत यावे, अशा वारंवार सूचना करूनही पालिकेतील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाहीत, ही बाब लक्षात आल्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालिकेत नवा पायंडा पाडण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी तब्बल 54 लेटलतीफ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वागत बॅंजोच्या गजरात व हारतुऱ्यांसह गुलाब पुष्प देऊन केले. त्यामुळे अनेक जण खजील झालेले दिसले. 

येथील पालिका स्वच्छ सर्वेक्षणात देशातील एक लाख लोकसंख्येच्या आतील पालिकांमध्ये पहिल्या क्रमांकावर आली. सलग दोन वेळा स्वच्छ सर्वेक्षणचा पुरस्कार पालिकेने प्राप्त केला आहे. त्या अनुषंगाने शहरात विविध उपक्रमाद्वारे शिस्त लावण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. त्याची सुरवात पालिकेच्या कार्यालयीन कामकाजापासून करण्याचे मुख्याधिकारींनी ठरविले. त्यानुसार त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हसत शिस्त लावण्याचे काम सुरूच केले आहे. सलग तीन शुक्रवार "सायकल डे' पाळण्यात येत आहे. आजच्या चौथ्या शुक्रवारीही तो नियम पाळला गेला.

कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्त्व कळावे, यासाठी मुख्याधिकारी हे स्वतः सकाळी 8.30 वाजल्यापासून पालिकेत असतात. अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी 9.30 पर्यंत यावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. वारंवार सूचना करूनही "लेटलतीफ' कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळा पाळल्या नाहीत. अखेर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पालिकेत नवीन पायंडा पाडण्यासाठी डाके यांनी नवीन कल्पना लढवली. त्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी "लेटलतीफ' कर्मचाऱ्यांच्या बॅंजोच्या गजरात स्वागत करण्याचे ठरवले. त्यानुसार आज सकाळी साडेनऊनंतर येणाऱ्या लेटलतीफ 54 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकारी, प्रशासकीय अधिकारी प्रशांत कांबळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी स्वागत केले. या वेळी 54 जणांना हार तुरे, पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यांचे बॅंजोच्या गजरात स्वागत झाले. 

जेवढ्या लवकर पालिकचे काम सुरू होईल, तेवढ्या सुविधा नागरिकांना देता येतील, अशी लवकर काम सुरू करण्यामागची भूमिका आहे. त्यात कोणी कमी आहे, ते दाखविण्याचा हेतू नाही. सगळ्यांनाच शिस्त लागावी, यासाठी हसत सगळ्यांना समाजविण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे. 
-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.