शासनाच्या आदेशाचे पालन करत साताऱ्यात मस्जिद खुले; मस्जिदीत लहान मुले, वयोवृध्दांना प्रवेश नाकारला!

शासनाच्या आदेशाचे पालन करत साताऱ्यात मस्जिद खुले; मस्जिदीत लहान मुले, वयोवृध्दांना प्रवेश नाकारला!
Updated on

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे दर्शनासाठी कधी खुली होणार या भाविकांच्या प्रश्नाला दीपावली पाडव्यादिवशी पूर्णविराम मिळाला. साता-यात मस्जिद ही भाविकांसाठी खुले करण्यात आले. तद्नंतर सामुहिक नमाज अदा करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वयोवृध्द व दहा वर्षाच्या मुलांना मस्जिद प्रवेश नाकारण्यात आल्याचे चित्र आहे. 

तब्बल आठ महिन्याच्या कालावधीनंतर राज्यातील मंदिरं शासनाच्या आदेशानुसार भाविकांसाठी काल खुली करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार साता-यात मस्जिदमध्ये सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. लहान मुलांना मंदिरात प्रवेश नसल्याने काहीजण बाहेरून दर्शन घेताना दिसत आहेत. मस्जिद परिसरातील मोजकी दुकाने काल सुरू होती.

मुस्लिम समितीने केलेल्या नियोजनाप्रमाणे सकाळी नऊ वाजता भाविकांनी शिस्तीत मस्जिदीत प्रवेश केला. प्रवेशदारातच प्रत्येकाच्या हाती सॅनिटायजर देऊन थर्मोगणच्या साह्याने तपासणी केली जात होती. सामाजिक अंतर ठेवून भाविक प्रवेश करून मस्जिदीत दर्शन घेत होते. मस्जिद परिसरात भाविकांना थांबण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मस्जिददरबारीमध्ये सामाजिक अंतरासाठी गोल खुणा करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.