फलटण शहर (ता. खटाव) : फलटण नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी कालपासून मनसेचे जिल्हा उपप्रमुख युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मितेश तथा काकासाहेब खराडे यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनास विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवकांनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी मार्चमध्ये अतिक्रमण मोहीम सुरू केली होती. ही मोहीम चार दिवस चालल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. नगरपालिकेने राबविलेल्या मोहिमेत गोरगरिबांच्या अतिक्रमणांवर हातोडा व जेसीबी चालविला होता. मात्र, बड्यांनी केलेली अतिक्रमणे अद्यापही आहेत. त्यामुळे या मोहिमेने गोरगरिबांबर व हातावरचे पोट असणाऱ्या अनेक छोट्या व्यावसायिकांवर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया शहरातून उमटत आहेत. अनेकांनी हटविलेल्या जागी पुन्हा पक्क्या व कच्च्या स्वरुपातील बांधकामांना प्रारंभ केला आहे. मुख्य व वर्दळीचे रस्ते व चौक येथील अतिक्रमण काढल्यानंतर राडारोडा जागीच असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरू करावी अन्यथा 21 डिसेंबरपासून धरणे आंदोलनाचा देण्यात आला होता; परंतु त्यास नगरपालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने काल (सोमवार) शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवराज शिंदे व काकासाहेब खराडे यांनी बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.
दरम्यान, सोमवारी या आंदोलनास फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम, नगरपालिकेचे गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, भाजपचे रवींद्र फडतरे, राजेश शिंदे, अमोल सस्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, कॉंग्रेसचे अमीरभाई शेख, शिवसेनेचे राहुल पवार, मनसेचे नीलेश जगताप, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शहराध्यक्ष महादेव गायकवाड, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, दलित पॅंथरचे तालुकाध्यक्ष मंगेश आवळे, प्रीतम जगदाळे, मेहबुबभाई मेटकरी, राहुल शहा, उषा राऊत, सुभाष जेबले आदींनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.