शूरवीरांच्या मातीतील असल्याचा सार्थ अभिमान : खासदार पाटील

शूरवीरांच्या मातीतील असल्याचा सार्थ अभिमान : खासदार पाटील
Updated on

वहागाव (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात अशी सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची इतिहासात ओळख आहे. बाजी म्हणजे जिवाची बाजी लावणारा आणि ते काम छत्रपतींच्या स्वराज्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केले. सरसेनापतींचे छत्रपतींच्या घराण्याशी नातेसंबंधही होते. महाराणी ताराराणी, सोयराबाई या गावच्या म्हणूनच तळबीडला ऐतिहासिक महत्त्व आहे. गावाने ही परपंरा आजही जपली आहे. आपल्याला सार्थ अभिमान आहे, की आपण या शूरवीरांच्या मातीतील आहोत, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
 
तळबीड (ता. कऱ्हाड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले. बांगलादेश युद्धातील भारतीय सैन्य दलाच्या विजयाप्रीत्यर्थ गेल्या दोन दशकांपासून कऱ्हाड येथे मोठ्या दिमाखात विजय साजरा केला जातो. विजय दिवस समारोहाचे संयोजक कर्नल संभाजी पाटील यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तळबीड येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधिस्थळी मानवंदना व अभिवादन करण्याची परंपरा गेल्या 12 वर्षांपासून सुरू ठेवली आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे विजयदिवस साजरा करता आला नसला, तरी सरसेनापतींना अभिवादन करण्यासाठी विजय दिवस संयोजक टीम व मान्यवर तळबीड येथे उपस्थित राहिले. 

खासदार पाटील यांनी सरसेनापतींच्या समाधिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील, सरपंच जयवंत मोहिते, उपसरपंच लालासाहेब वाघमारे, निवृत्त सुभेदार शामराव मोहिते, ग्रामविकास अधिकारी प्रमोद ठोके आदी मान्यवर उपस्थित होते. तळबीडचा ऐतिहासिक ठेवा जतन होऊन लोकांनी या गावात यावे, येथील पुरातन मंदिरे, वास्तूंचा जीर्णोद्धार व्हावा, यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जयाजी मोहिते, अभिजित गायकवाड, जयप्रकाश मोहिते, अनिल मोहिते, ग्रामपंचायत पदाधिकारी, माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.