सातारा : सातारा पालिकेच्या (satara muncipal council) बांधकाम सभापती सिद्धी पवार (siddhi pawar) यांनी मुख्याधिकारी (chief officer) अभिजित बापट यांच्याविषयी वापरलेल्या अर्वाच्य भाषेचा निषेध पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत केला. या आंदोलनावेळी सिद्धी पवार यांच्यावर पालिका प्रशासनाने कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज साेमवारी दिवसभर ठप्प होते. (satara-news-muncipal-council-workers-condemns-corporator-siddhi-pawar-behaviour)
भुयारी गटार योजनेच्या कामादरम्यान पडलेल्या भिंतीच्या दुरुस्तीस विलंब होत असल्याने बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी ठेकेदारास फोन करत दमदाटी तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी देत असतानाच त्यांनी अर्वाच्य भाषा वापरत पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत विकासकामांत अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना खासदार उदयनराजे यांनी पालिका प्रशासनास केल्या होत्या.
या सूचना करूनही पालिका प्रशासनाने पवार यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सकाळी पालिकेच्या प्रवेशव्दारावर जमत सिद्धी पवार यांचा निषेध केला. निषेध नोंदवत असतानाच त्यांनी पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाची घोषणा केली.
या आंदोलनात सर्वच सहभागी झाल्याने पालिकेचे कामकाज सोमवारी ठप्प झाले होते. दरम्यान, या बंदला सर्वच संघटनांनी पाठिंबा दर्शवला. पवार यांनी वापरलेली भाषा अयोग्य असून, त्याचा निषेध होणे आवश्यकच आहे. हा निषेध करताना कामबंद आंदोलनाऐवजी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले असते तर ते सातारकरांच्या हिताचे ठरले असते, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या गणेश दुबळे यांनी नोंदवली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.