दहिवडी (जि. सातारा) : सामान्य नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रशासनाने दहिवडी शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणला होता. मात्र, पुन्हा एकदा शहरात कोरोनाचा आकडा वाढत असल्याची चिन्हे दिसू लागल्याने नागरिकांनी सावधान होण्याची गरज आहे. शहरासोबत माणमधील अनेक गावांमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव प्रशासनाची चिंता वाढविणारा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात आणि त्यासोबतच माण तालुक्यातसुद्धा कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. मागील काही दिवसांपूर्वी शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. ग्रामीण भागातही कमी- जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. बिकट झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण शहरात कित्येक दिवस कंटेनमेंट झोन लागू करण्यात आला होता, तसेच संपूर्ण शहराचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले होते.
मागील काही दिवस अपवादात्मक रुग्ण शहरात आढळत होते. मात्र, 28 मार्च रोजी शहरात एकाच वेळी नऊ कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा एकदा शहरात कोरोना डोके वर काढतो, की काय अशी भीती सतावू लागली आहे. नागरिकांचा थोडासा निष्काळजीपणा शहराला पुन्हा संकटात नेऊ शकतो. शहरात कोरोना वाढणे कोणालाही परवडणारे नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, तसेच प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
सध्या माण तालुक्यात 189 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी म्हसवडमध्ये 27, दहिवडीत 15, वावरहिरे- 14, भाटकी- 11, पाचवडमध्ये 10 रुग्ण आहेत. माणमधील 96 पैकी 46 गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत झालेला कोरोनाचा शिरकाव धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे माणच्या जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याची व शासनाने घातलेले निर्बंध पाळण्याची आवश्यकता आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.