गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ अटकेत; सीईओंकडून झाडाझडती

arrest
arrestesakal
Updated on

सातारा : विविध कारणांवरून नाहक त्रास देत जवळीक साधून विनयभंग करत शरीरसुखाची मागणी करणारा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याला सातारा तालुका पोलिसांनी साेमवारी रुग्‍णालयातून ताब्‍यात घेतले. ताब्‍यात घेतलेल्‍या धुमाळ याला आज (मंगळवारी) न्‍यायालयात हजर करण्‍यात येणार असल्‍याची माहिती सहाय‍क निरीक्षक अभिजित चौधरी यांनी दिली. (satara-news-police-arrested-education-officer-sanjay-dhumal-torubles-teacher)

सातारा तालुक्‍यातील एका शाळेत एक शिक्षिका कार्यरत असून, तिने सातारा पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्‍याविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात विनयभंगाची तक्रार नोंदवली होती. यानुसार सातारा तालुका पोलिसांच्‍या पथकाने धुमाळ याला ताब्‍यात घेत अटकेची कार्यवाही सुरू केली होती. या कारवाईसाठीची वैद्यकीय तपासणी होत असतानाच धुमाळ यांनी प्रकृतीबाबतची तक्रार नोंदवली. यानुसार धुमाळ याला जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले.

arrest
बहुचर्चित कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे मतदान सुरु

सोमवारी धुमाळ याची प्रकृती उत्तम असल्‍याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्‍यानंतर सातारा तालुका पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेत अटकेची कारवाई केली. अटकेतील धुमाळ याला सध्‍या सातारा शहर पोलिस ठाण्‍याच्‍या बंदीगृहात ठेवण्‍यात आले असून, मंगळवारी त्‍याला जिल्‍हा न्‍यायालयासमोर हजर करण्‍यात येणार आहे. याचा तपास सातारा तालुका पोलिस ठाण्‍याचे सहायक निरीक्षक अभिजित धुमाळ हे करीत आहेत.

arrest
पाचगणी- महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद

सीईओंकडून शिक्षण विभागाची झाडाझडती

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रकरण गाजत आहे. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन ताब्यात घेतले, तरी प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना माहिती देण्यात आली नव्हती. ही माहिती साेमवारी सकाळी समजल्यावर त्यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावत सर्वांचा समाचार घेतला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मला तत्काळ देण्याचे आदेश गौडा यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या सातारा तालुक्यातील एका प्राथमिक मराठी शाळेतील महिला शिक्षिकेने गटशिक्षणाधिकाऱ्यांवर तक्रार केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, रविवारी त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकारामुळे प्राथमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा यांना माहिती देणे बंधनकारक होते. प्रत्यक्षात त्यांना माहिती देण्यातच आली नाही. त्यामुळे प्रत्येक सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत असतात. मात्र, सोमवारी त्यांनी सर्वप्रथम शिक्षण विभागाची बैठक घेत सर्वांची झाडाझडती घेतली.

arrest
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना जिल्हा परिषदेत नोकरी

या बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, सर्व उपशिक्षणाधिकारी, सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, विस्ताराधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, संबंधित महिला शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या विरोधात विशाखा समितीकडे लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रारीची कार्यवाहीचे काय झाले, अशीही विचारणा मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी संबंधित विभागाला केली. त्यावर सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश गौडा यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.