जिल्ह्यात सद्य:स्थितीत लॉकडाउनचा कोणताही विचार नाही : शेखर सिंह

जिल्ह्यात सद्य:स्थितीत लॉकडाउनचा कोणताही विचार नाही : शेखर सिंह
Updated on

सातारा : सद्य: परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाउन करावे, अशी स्थिती सध्यातरी नाही. शासनाकडूनही आगामी काळात लॉकडाउनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लॉकडाउन करण्याचा विचार नाही. नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉकडाउनबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. 

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी झालेला आहे. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयांत आवश्‍यक ते उपचार मिळत आहेत. पण, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करून पुन्हा लॉकडाउन होणार असल्याबाबतच्या अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा व्यावसायिकांसह नागरिकांत दुसऱ्या लॉकडाउनच्या चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून नेमकी माहिती जाणून घेतली. 

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, "सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग खूपच कमी झालेला आहे. तसेच शासकीय रुग्णालयांत सर्वसामान्य नागरिकांना बाधित झाल्यावर उपचारही मिळू शकत आहेत. तसेच मृत्यूचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याने पुन्हा लॉकडाउन होणार ही अफवा आहे. सोशल मीडियावरील या अफवांवर नागरिकांनी विश्‍वास ठेऊ नये.'' तसेच सध्याची कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने पुन्हा लॉकडाउन करण्याचा विचार नाही. तसेच शासनाकडूनही याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनबाबतच्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.