मल्ल्या गेलाय लंडनला... मल्ल्याच्या चुका ज्या बॅंकेने केल्या, त्या बॅंकेला पैसे द्यायचे का?; सभापतींचा 'रिझर्व्ह'वर घाव

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News
Updated on

बिजवडी (जि. सातारा) : रिझर्व्ह बॅंक सहकाराच्या मुळावर उठली आहे. त्यांना सहकारी संस्था मोडीत काढायच्यात. त्यामुळेच त्यांचे जाचक नियम पतसंस्था, जिल्हा बॅंकांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मल्ल्या गेलाय लंडनला... मल्ल्याच्या चुका ज्या बॅंकेने केल्या त्या बॅंकेला केंद्र सरकारच्या तिजोरीतून पैसे द्यायचे, हा कुठला धंदा... येणाऱ्या काळात सहकार क्षेत्रावर मोठे संकट घोंघावत आहे. त्यामुळे सहकार टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. 

वावरहिरे (ता. माण) येथे श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वावरहिरे शाखेच्या इमारत नूतनीकरण उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नरेंद्र पाटील, सुभाष नरळे, संदीप मांडवे, उपनगराध्यक्ष धनाजी माने, एम. के. भोसले, बाळासाहेब सावंत, सरपंच चंद्रकांत वाघ, रमेश कदम, सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पोळ, उपाध्यक्ष सुरेश इंगळे उपस्थित होते. 

जिल्हा बॅंकेची निवडणूक लवकरच लागतेय. जिल्ह्यात नेहमीप्रमाणे माण तालुक्‍यातच बॅंक निवडणुकीचा जास्त जोर दिसतोय. ठराव कोणाचे झालेत, कसे झालेत, किती झालेत, यापेक्षा योग्य माणूस निवडून द्या. आपल्याला बॅंक चालवायचीय... बंद पाडायची नाही... अशी कोपरखळी यावेळी रामराजेंनी विरोधकांना मारली. या वेळी प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, नरेंद्र पाटील यांची भाषणे झाली. सभासदांच्या वतीने वीरभद्र कावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात सुनील पोळ यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या संचालिका नीलिमाताई पोळ यांनी स्वागत केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक महादेव गोंजारी यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.