सैदापूर-गोवारेतील कृष्णा कालवा फुटण्याचा धोका?; बळीराजाचे राज्यमंत्री बच्चू कडूंना साकडे

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : सैदापूर-गोवारे गावांमधून जाणारा कृष्णा कालव्याचे अस्तरीकरण करण्याबाबत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांना देण्यासाठी उपसा सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने साजीद मुल्ला व शेतकऱ्यांनी निवेदन दिले. 

निवेदनातील माहिती अशी : कृष्णा कालवा हा सैदापूर गोवारे या गावामधून जातो. कृष्णा कालवा हा मातीत असल्यामुळे पावसाळ्यामध्ये, तसेच अतिवृष्टीमुळे हा कालवा वारंवार खचत आहे. अस्तरीकरण नसल्यामुळे त्यात भरच पडत असल्याने कालव्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे, तसेच हा कालवा स्वच्छ करण्यासाठी, तसेच खचलेला भाग भरून घेण्यासाठी सरकारला दर वर्षी लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे सरकारला दर वर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. 

कालव्यात दुर्घटनेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गोवारे गावातील ग्रामस्थ, शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थीही याच रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करतात. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. कालवा जागोजागी खचल्यामुळे भविष्यात कालवा फुटण्याची भीती आहे. त्याचा विचार करून तातडीने कालव्यास अस्तरीकरण करावे. या वेळी सरपंच वैभव बोराटे, उपसरपंच विजय पाटील, शिवाजीराव कदम, जयवंत महाडिक, शंकर कोळगे यांनी निवेदन दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.