रंगपंचमी खेळून केलेली अंघोळ ठरली अखेरची; सातारच्या यशराजचा कोल्हापुरातील खणीत बुडून मृत्यू

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

कुडित्रे : चंबुखडी शिंगणापूर (ता. करवीर) येथे रंगपंचमी खेळून पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्यांचा खणीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले. यशराज राजू माळी वय 17 असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली दुपार पर्यंत घटनेची नोंद 
करवीर पोलिसात करण्याचे काम सुरु होते आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, यशराज माळी हा आपली आई योगिता माळी,रा. सातारा येथील असून गेली अनेक वर्षे शिंगणापूर येथील मामा पवन कुमार सावंत यांचेकडे राहतात. यशराज यांच्या वडिलांचा गेल्या चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. आज रंगपंचमी खेळल्यानंतर 11 वाजता मसोबा मंदिरामागील खणीत यशराज माळी व मारुती कस्तुरे वय 17, आणि अन्य मित्रांसोबत पोहायला गेले होते. यशराज आणि मारुती या दोघांना पोहता येत नव्हते. तरीही खणीत या दोघांनी उडी ठोकली, यावेळी दोघे पाण्यात बुडताना पाहून काठावर बसलेला अभिषेक खेतल याने दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी टाकली. सुरुवातीला मारुती कस्तुरे या विद्यार्थ्याला अभिषेकने बाहेर काढले, यावेळी यशराज खाली तळात गेला तो वर आला नाही, यावेळी अभिषेक याने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यशराज सापडला नाही. 

या घडलेल्या घटनेची माहिती नागरिकांना समजतात अग्निशामक दलाचे जवान, व आपत्ती व्यवस्थापन यांना सांगण्यात आली आणि गाळात अडकलेल्या यशराज याला बाहेर काढण्यात आले व उपचारासाठी सीपीआरला पाठवण्यात आले. उपचारापूर्वीच यशराज मयत झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, यशराज हा आई योगिता यांना एकुलता एक होता, या महिन्यात दहावीची परीक्षा देणार होता, बोलका स्वभाव असणाऱ्या यशराजच्या मृत्युमुळे गणेश कॉलनी मध्ये हळहळ व्यक्त होत होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()