दहिवडी (जि. सातारा) : "सुटी नाय द्यायची... निर्णय झाल्याशिवाय जायचं नाय. किती का दिवस लागना इथनं जायचं नाय. त्यांनी फेऱ्या वारीत फक्त दमवायचं धरलंय. आज निर्णय नाय झाला, तर उद्याच्याला शंभराचं सव्वाशे होऊ. दिवसाला पन्नास, पंचवीसजण वाढवू,' असा निर्धार अठ्ठ्याऐंशी वर्षीय यशवंत जगताप यांनी व्यक्त केला.
म्हसवड परिसरातील कूळधारक शेतकऱ्यांच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज सहावा दिवस होता. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यशवंत जगताप या शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
यशवंत जगताप म्हणाले, ""सोळा आण्याचा रुपाया असतू त्यो बत्तीस आण्याचा झालाय. जमीन एकरच पण झालीय दोघांच्या नावावर. तलाठ्याकडं गेलं की त्यो म्हणतूय तुमची नावंच निघत नाहीती. ऑनलाईननं नावं आपूट निघून गेलीती. वाड्यातली (जमीनदार) माणसं व्हयचं म्हणलीती, कधी कुणाला नाय म्हणली नायती, कावली नायती; पण नावाव करून देण्याच्या नावानं ठणठण गोपाळा.' या वेळी निर्णय होईल, अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. एकूणच मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटायचं नाही, असा ठाम निर्धार ठिय्या आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.