Satara News : वाईत रस्त्याच्या वादातून मारहाण; एकाच कुटुंबातील आठ जण जखमी, ११ जणांवर गुन्हा

मानकुंबरे वस्तीलगत मोहन जाधव यांनी नुकतीच जागा खरेदी केली आहे.
satara
satarasakal
Updated on

वाई - रस्त्याच्या वादावरून झालेल्या मारहाणीत मानकुंबरे कुटुंबातील आठ जण गंभीर जखमी झाले. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. सकाळी सात वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी ११ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर सकल मराठा व इतर समाजातील नागरिकांनी पोलिस ठाण्या समोर मोठी गर्दी केली. यावेळी त्यांनी मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दिवसभर पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण होते

याबाबतची माहिती अशी, वाई - सातारा रस्त्यावर असलेल्या

मानकुंबरे वस्तीलगत मोहन जाधव यांनी नुकतीच जागा खरेदी केली आहे. त्याला जाण्या - येण्यासाठी रस्ता नाही. ते मानकुंबरे यांच्या मालकीच्या रस्त्याचा वापर करीत होते. त्यावरून मानकुंबरे व जाधव या दोन लगतदारांमध्ये पूर्वीपासून जाण्या - येण्याच्या रस्त्यावरून वाद आहेत. त्याबाबतचा खटला न्यायालयात सुरू आहे. आज सकाळी मोहन जाधव यांनी आपल्या जागेमध्ये बोअर घेण्यासाठी वाहन मागवले होते.

satara
Satara Crime : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा मराठवाडी धरणात आढळला मृतदेह; घात की अपघात? पोलिसांचा बळावला संशय

त्यांनी वाहन आत घेऊन जाण्यासाठी मानकुंबरे यांना गेट उघडण्यास सांगितले. मात्र सदर गाडी गेटमधून आत जाणार नव्हती. त्यामुळे मानकुंबरे यांनी या गाडीला आत जाण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्याचे मारहाणीत रूपांतर झाले. मोहन जाधव यांच्या सोबत आलेल्यांनी मानकुबंरे यांच्या घरातील पुरुष व महिलांना लोखंडी रॉड व लाकडी दाडक्यांनी जोरदार मारहाण केली. तसेच गाडयांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. यामध्ये मानकुंबरे यांच्या कुटुंबातील सचिन शामराव मानकुंबरे, संदीप मानकुंबरे, गणेश मानकुंबरे, संतोष मानकुंबरे, रेखा संतोष मानकुंबरे,सोनाली मानकुबंरे, भाग्यश्री गणेश मानकुंबरे, कलावती अमृत मानकुबरे हे गंभीर जखमी झाले.

satara
Satara News : जिल्हाधिकाऱ्यांची कन्या कोंडव्याच्या अंगणवाडीत; जितेंद्र डुडी, आंचल दलाल यांनी ठेवला आदर्श

डोक्याला मारहाण झाल्याने संदीप मानकुंबरे याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मोहन सावकार जाधव, सावकार सदाशिव जाधव, लखन जाधव, पवन उर्फ पांग्या जाधव, सचिन जाधव, उज्वला मोहन जाधव, प्रिया उर्फ पिया लखन जाधव, राधा जाधव, काजल सचिन जाधव, किरण घाडगे व रॉकी घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.