सातारा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) आज जिल्ह्यातील १८ केंद्रांवर झाली. या परीक्षेस ५२२ शाळांमधील ८ हजार ४६२ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार २३९ विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ८ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार २३९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. २१९ विद्यार्थी गैरहजर होते. ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी अनेक केंद्रांना भेटी दिल्या. उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारेंनी मेढ्यातील वेण्णा विद्यामंदिर केंद्रास भेट देऊन सूचना केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.