कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे सध्या सर्वत्र आर्थिक कोंडी झाली आहे. तीन महिन्यांत लोकांचा कामधंदा, व्यवसाय, उद्योग बंद राहिल्याने मोठे आर्थिक संकट आले आहे. या संकटकाळात धीर देण्यासाठी प्रशासनाने येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पिवळे, केशरी आणि पांढऱ्या रेशनिंग कार्ड असणाऱ्या महिलांची मोफत प्रसूती करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैपर्यंत मोफत प्रसूतीची कार्यवाही सुरू राहणार आहे.
कोरोनामुळे सध्या महामारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. गेली तीन महिने हाताला काम नसल्याने आणि उद्योग-व्यवसाय बंद राहिल्याने मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असली तरी त्याला अजूनही बराच काळ लागणार आहे. यादरम्यानच्या काळात अगोदरच पैशांची चणचण झाल्याने दवाखान्यांचा खर्च न परडवणाराच ठरत आहे. खासगी रुग्णालयात प्रसूती करण्यासाठी किमान 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च येतो. त्याचबरोबर इतरही विविध कारणांसाठी खर्च करावा लागतो. या महामारीच्या काळात लोकांना एवढा खर्च करणे शक्य नाही. त्यासाठी अनेकांवर उसनेपासने करण्याची वेळ आली आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने येथील सह्याद्री हॉस्पिटलला मोफत प्रसूती करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पिवळे, केशरी आणि पांढऱ्या रेशनिंग कार्ड असणाऱ्या महिलांची मोफत प्रसूती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 31 जुलैपर्यंत मोफत प्रसूतीची कार्यवाही सुरू राहणार आहे. त्याला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जोड देवून कोरोनाच्या संकट काळात मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्याचा मोठा हातभार सर्वसामान्य कुटुंबातील प्रसूत होणाऱ्या महिलांना लागणार आहे.
""सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पिवळे, केशरी आणि पांढऱ्या रेशनिंग कार्ड असणाऱ्या महिलांची मोफत प्रसूती करण्यात येणार आहे. हॉस्पिटलमध्ये 31 जुलैपर्यंत मोफत प्रसूतीची कार्यवाही सुरू राहणार आहे. त्यानंतर पुढील आदेश आल्यावर प्रसूतीसंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाईल.''
-विश्वजित डुबल,
सहायक व्यवस्थापक,
सह्याद्री हॉस्पिटल, कऱ्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.