कोरोना
कोरोना

काळजी वाढली... कऱ्हाडात अपुरी पडू लागली रुग्णालये

Published on

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व कृष्णा रुग्णालय कोविड 19 साठी आरक्षित केले गेले. त्यातील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाचे रुग्ण सह्याद्री हॉस्पिटलला स्थलांतरित केले. त्यामुळे सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 100 खाटा व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 50 खाटांवर कोरोना रुग्णांच्या उपचाराची सोय होती. या दोन्ही कोविड रुग्णालयात कऱ्हाडसह पाटण तालुक्‍यातील बाधितांवर उपचार केले जात होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यातील बाधितही येथे उपचार घेऊन परतले आहेत. मात्र, गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात बाधितांची वाढणारी संख्या प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी होऊन बसली आहे.

बाधितांमुळे त्यांच्या संपर्कातील लोकही बाधित होत असल्याने ही संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील बाधितांचा टप्पा साडेबाराशेपर्यंत गेला आहे. गेल्या 15 दिवसांपासून वाढलेल्या रुग्णांमुळे उपचार घेणाऱ्या जिल्ह्यातील बाधितांची संख्या आजअखेर 413 आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या रुग्णांमुळे सध्याची कोविड हॉस्पिटल अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यासाठी प्रशासनाने आणखी काही हॉस्पिटलची तयारीही ठेवली आहे. त्यानुसार येथे एरम हॉस्पिटलमध्ये 28 खाटांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलपाठोपाठ आता एरम हॉस्पिटल हे तिसरे कोविड रुग्णालय बनले आहे. काल जिल्ह्यात 101 बाधित सापडले. त्यातील चार बाधितांना उपचारासाठी एरम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

लोकांनी कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक व सुरक्षित अंतर आदींसह शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, तरच संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. अन्यथा रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

पार्लेतही 33 बाधित... 
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, अशा 33 रुग्णांना प्रशासनाने पार्ले येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. त्यामुळे कऱ्हाडमध्ये तीन कोविड हॉस्पिटलबरोबरच पार्लेतील कोरोना केअर सेंटरमध्येही बाधित दाखल होत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.