Satara : लोणंदला कांदा दरात घसरण

केंद्राच्या निर्यात बंदीचा फटका : प्रतिक्विंटलला ५०० ते ७०० रुपये कमी
Satara
SataraSakal
Updated on

लोणंद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारात कांदा पिशव्यांच्या आवकेत काहीशी वाढ झाली. मात्र, हळव्या व गरव्या कांद्याचे भाव गेल्या बाजारच्या तुलनेत प्रतिक्विंटलला ५०० ते ७०० रुपयांनी घसरले आहेत. केंद्र शासनाने कांद्यावर घातलेल्या निर्यात बंदीचा कांद्याच्या भावाला फटका बसला आहे. दरम्यान, शेतकरी वर्गातून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

Satara
Fitness Tips : कपालभाती करताना 'या' चुका टाळा; तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हळव्या लाल व गरव्या कांद्याची आवक सुरू आहे. या परिसरात अद्यापही हळव्या लाल कांद्याचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजारात हळव्या कांद्याची मोठी आवक होत आहे. आजच्या बाजारात हळव्या कांद्याच्या दोन हजार ५०० तर गरव्या कांद्याच्या ५०० पिशव्यांची आवक झाली. सोमवारी झालेल्या बाजारापेक्षा आजच्या बाजारात एक हजार पिशव्यांची आवक वाढली. कांद्यावरील निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दराला मात्र फटका बसला आहे. दरात ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात नंबर एकच्या गरव्या कांद्याचे भाव चार हजार १०० रुपये, तर हळव्या कांद्याचे भाव तीन हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला निघाले होते. मात्र, बाजारात नंबर एकच्या गरव्या कांद्याचा भाव तीन हजार ६०० तर हळव्या कांद्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांपर्यंत निघून भावात ५०० ते ७०० रुपयांची प्रतिक्विंटलला घसरण झाली आहे.

Satara
Relationship Tips :  लग्नाआधीच बदला या सवयी, वैवाहीक जीवनाचा प्रवास होईल सुखकर

शेळ्या- मेंढ्या, वैरणीचीही आवक

जनावरांच्या व शेळी, मेंढी बाजारात जनावरे व शेळ्या- मेंढ्या व वैरणीचीही आवक झाली होती. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल चांगला वाळवून व प्रतवारी करून बाजारात विक्रीसाठी आणण्याचे आवाहन सभापती प्रा. सुनील शेळके- पाटील, उपसभापती भानुदास यादव, सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.

Satara
Career Tips : जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत

कांद्याला लागवडीपासून रोपे, खुरपणी, औषधांसाठी होणारा उत्पादन खर्च आणि पीक आल्यावर काढणी, काटणी, वाहतूक, बारदान आदींसाठी होणारा सर्व खर्च पाहता कांद्याला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये भाव मिळाल्याखेरीज कांदा पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यापेक्षा खाली दर आले, तर शेतकऱ्यांचा कसलाच मेळ बसत नाही. यासाठी केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी.

- अंकुश पडळकर, कांदा उत्पादक शेतकरी, मोर्वे (ता. खंडाळा)

असे आहेत दर

प्रतवारीनुसार कांद्याचे भाव (प्रति क्विंटल, रुपयांत)

गरवा कांदा नं. १ २५०० ते ३६००

गरवा कांदा नं. २ १५०० ते २५००

गरवा गोल्टी कांदा १००० ते १५००

हळवा कांदा नं. १ २००० ते २८००

हळवा कांदा नं. २ १२०० ते २०००

हळवा गोल्टी कांदा ९०० ते १२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.