सातारा : पालखी मार्गाची कामे २० जूनपर्यंत पूर्ण करा

जिल्हाधिकारी शेखर सिंह; जिल्ह्यात २८ जून ते चार जुलैपर्यंत सोहळा
Ashadhi Wari Updates | Palkhi Marg
Ashadhi Wari Updates | Palkhi Margsakal
Updated on

सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जिल्ह्यातून २८ जून ते चार जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या सोहळ्याची प्रशासनातर्फे तयारी वेगाने सुरू असून, वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची कामे संबंधित विभागांनी २० जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. (Ashadhi Wari Updates)

श्री.सिंह म्हणाले,‘‘संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी लोणंद येथील नीरा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका नीरा स्नानासाठी जाणारा रस्त्याचे बॅरिकेटिंग व दत्त घाटावरील स्वच्छता करण्यात येत आहे. दत्त घाट, नीरा नदी, पाडेगाव ते पालखी तळ लोणंद या पालखी मार्गावरील सर्व खड्डे बुजवणे, साइडपट्टी भरून घेऊन व रस्त्याच्या बाजूची काटेरी झुडपे काढण्याबरोबर स्वच्छतेची कामेही करण्यात येत आहेत. पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे, म्हणून पिण्याचे पाण्याच्या स्त्रोताचे आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर पालखीचा फलटण मुक्कामासाठी मुख्य रस्ता ते विमानतळ (पालखी तळ) या मार्गावरील रस्त्याची डागडुजी, पालखी तळावर पालखी येण्यापूर्वी स्वच्छता, पालखी तळावर पुरेशी तात्पुरती शौचालये, शौचालयाच्या ठिकाणी पाणी आदी सुविधा करण्यात येत आहेत.’’

पालखी तळावर महिलांसाठी स्नानगृह उभे करण्यात येत आहे. विसाव्याच्या ठिकाणी मुख्य रस्त्यापासून प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी रस्ता रॅम्प तयार करण्यात येत आहे. पालखी मार्गावरील व मुक्कामाच्या ठिकाणी विजेचे खांब, तारा यांची तपासणी, पालखीच्यावेळी खासगी वाहतुकीचे नियंत्रण करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. वारकऱ्यांच्या व भाविकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी पुरेशी आरोग्य व्यवस्था करण्याचे आदेश श्री. सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नियंत्रण कक्षाची उभारणी

पालखी तळाच्या ठिकाणी मुरुम टाकून त्याचे सपाटीकरण व रोलिंग करण्यासोबत स्नानगृह, धोबी घाट व स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. याचबरोबर फिरत्या शौचालयांची व्यवस्थाही करण्यात येत आहे. या शौचालयांना तात्पुरती वीज जोडणी देण्यात येणार आहे. याचबरोबर पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून, नियंत्रण कक्षात २४ तास अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.