सातारा : निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर झाली पोच

सह्याद्री कारखान्याच्या सहा कर्मचाऱ्यांना लाभ
सातारा : निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर झाली पोच
sakal
Updated on

कऱ्हाड : भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून प्रयास उपक्रमांतर्गत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर सुपूर्द करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या प्रयास उपक्रमामुळेच हे शक्य झाले, असे उद्‌गार क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त बिरेंद्र कुमार यांनी काढले.

सातारा : निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर झाली पोच
सातारा: आयडीबीआय बँकेस साडेचार लाखांचा गंडा; एकावर गुन्‍हा

सहायक आयुक्त अनिल चौगुले, लेखा अधिकारी श्रीकांत बरगे, प्रवर्तन अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, कारखान्याचे व्यवस्थापक पी. आर. यादव, आर्थिक सल्लागार एच. टी. देसाई, मुख्य लेखाधिकारी जी. व्ही. पिसाळ, जी. पी. करांडे, शेती अधिकारी एम. ए. पाटील, जे. डी. घार्गे, नितीन साळुंखे, पी. एस. सोनवणे, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, विकास चव्हाण, संजय साठे, मनोज थोरात, सचिन पाटील, सचिन सव्वाखंडे, अत्तार गवस आदी उपस्थित होते.

सातारा : निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेमेंट ऑर्डर झाली पोच
टास्‍क फोर्समध्ये सर्वसमावेशक निर्णय- जिल्हाधिकारी

कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि संस्थापक (कै.) पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीने कारखान्याची स्थापना झाली. सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे कामकाज सुरू आहे. पूर्वी पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे अनेक हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, प्रयास उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती दिवशीपासून पेन्शन ऑर्डर मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. रवींद्र दामोदर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.