छापा टाकला त्यावेळी बारबाला नाचत असल्याचे व त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात येत असल्याचे दिसून आले.
सातारा : पेट्री (ता. सातारा) येथील (Petri Village) राज कास हिल रिसोर्टवर (Raj Kas Hill Resort) सातारा तालुका पोलिसांच्या (Satara Police) पथकाने शनिवारी छापा टाकला. यात सहा बारबाला (Barbala) व त्यांच्यासोबत नाचणारे १८ जण, हॉटेल मालकासह २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत ८३ हजारांची रोकड, मोबाईल हँडसेट, साउंड सिस्टिम, डिस्को लाइट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलिस ठाण्यात सुरू होती.
पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्ट नावाच्या हॉटेलमधील एका हॉलमध्ये सहा बारबाला आणण्यात आल्या असून, त्या गिऱ्हाईकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाचत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. यानुसार त्यांनी उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांना कारवाईच्या सूचना केल्या.
यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक डी. ए. दळवी, पोलिस उपनिरीक्षक पाटील, हवालदार मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ, किरण जगताप, शंकर पांचागणे, शहर पोलिस ठाण्यातील नीलेश यादव, महांगडे, बामणे तसेच इतर कर्मचाऱ्यांसमवेत त्याठिकाणी छापा टाकला.
छापा टाकला त्यावेळी बारबाला नाचत असल्याचे व त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत सहा बारबाला, त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या १८ जणांना तसेच हॉटेल मालक, व्यवस्थापक, कर्मचारी यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या २१ जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.