सातारा : केस करू नये तसेच प्रकरण मिटविण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करून कानाखाली मारल्याप्रकरणी येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात भारतिय दंड संहिता कलम 385 नुसार खंडणीचा (जुलमाने घेणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तमन्ना आमीन मुजावर (वय 28, रा. माची पेठ, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. तमन्ना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्राची नावाच्या मैत्रीणीच्या माध्यामतून त्यांची ऐश्वर्या विठ्ठल जाधव हिच्याशी ओळख झाली. ऐश्वर्याने घरात रहात नसल्याचे सांगितले. त्यामुळे तमन्नाने तिला त्यांच्या घरी राहण्यास सांगितले. आक्टोंबर 2019 मध्ये त्यांनी ऐश्वर्याला कपडे खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये दिले होते. ते तिने काम करून परत केले. त्यानंतर तिने पुन्हा मित्राला देण्यासाठी, रूम भाडे देण्यासाठी तसेच खरेदीसाठी म्हणून 15 हजार रुपये उसने घेतले. त्यातील 12 हजार 250 रुपये तिने परत केले. शिल्लक राहिलेले अडीच हजार रुपये मागितल्यावर तिने कारणे देण्यास सुरवात केली.
सुशांत प्रकरणामुळे द कपिल शर्मा शो बॉयकॉट करण्याची होतेय मागणी
वारंवार कामावर बोलावून पैसे परत मागूनही पैसे दिले नाहीत. पैशाची गरज असल्याने तमन्ना यांनी तिच्याकडे तगादा लावला. त्यानंतर तिने माझी व मित्राची केस मुक्तांगण ऑफीसमध्ये ऍड. वर्षा देशपांडे यांच्याकडे चालू आहे. त्यातून पैसे मिळाले की देते असे ऐश्वर्याने सांगितले. पुन्हा पैशाची मागणी केल्यावर ऐश्वर्याने मुक्तांगण ऑफीसमध्ये यायला सांगितले.
जागतिक वारसास्थळी फुलांचा नजराणा यंदा होणार कैद?
सोमवारी (ता. 24) तमन्ना दुपारी अडीचच्या सुमारास बहिणीसह मुक्तागंण ऑफीसमध्ये गेल्या. तेथे पैशावरून त्यांचा ऐश्वर्याशी वाद झाला. त्यावेळी देशपांडे यांनी तिला आत बोलावून घेतले. तसेच ऐश्वर्या तुला काही माघारी देणार नाही, कुठल्याच वस्तू मागू नको, आम्ही तुझी हिस्ट्री काढू, तू काय धंदे करतेस आम्हांला माहित आहे असे त्या म्हणाल्या.
आमदारांच्या एका हाकेत उद्योगपतीने दिली लाखांची रेमडिसिव्हर इंजेक्शन्स
त्यानंतर तुम्ही माझी चौकशी करा असे तमन्ना यांनी त्यांना सांगितले. त्यावेळी हो करतो असे म्हणून त्यांनी कोणाला तरी फोन लावला व तमन्ना यांची चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर देशपांडे यांनी त्यांना रजिस्ट्रवर सही करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी आवाज चढवून बोलू नकोसे असे म्हणून कानाखाली मारली. तसेच माझ्या बहिणीला धक्का दिला. त्यानंतर देशपांडे यांनी आम्हाला तेथेच बसण्यास सांगून ऐश्वर्यास ऑफीसमध्ये बोलावून घेतले. तसेच आमच्यावर खोट्या केसेस करण्यास सांगितले.
पुरस्कारासाठी राजकीय पाठबळ हवे की, आणखी काय? मराठमोळ्या प्रियांकाचे मंत्र्यांना ट्विट
त्यानंतर ऐर्श्वयाने तुझ्यावर केस करू नये असे तुला वाटत असेल तर मला 50 हजार रुपये दे अशी मागणी ऍड. देशपांडे यांनी केली. पैसे दिले तर इथेच तुझी केस मिटवते असे त्या म्हणाल्या. अन्यथा ऐश्वर्याला सांगून तुझ्यावर खोट्या केसेस करण्यास सांगते असे देशपांडे म्हणाल्या. एवढे पैसे नाहीत म्हटल्यावर तुला एवढे पैसे द्यावेच लागतील असे ऍड. देशपांडे म्हणाल्याचे तमन्ना यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार ऍड. वर्षा देशपांडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.