साताऱ्यात दारूसह साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, मटण विक्रेत्यावरही गुन्हा

साताऱ्यात दारूसह साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, मटण विक्रेत्यावरही गुन्हा
Updated on

सातारा : लॉकडाउनच्या काळात जादा दराने विक्रीसाठी आणलेला बेकायदेशीर देशी व विदेशी दारूचासाठा सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. रविवार पेठेतील एका घरातून व बंद दुकानातून तब्बल 50 हजार 798 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी दारूबंदी कायद्यान्वये रविवार पेठेतील तानाजी बडेकर व अजय ऊर्फ पांड्या घाडगे (रा. 196 रविवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चीनी कंपन्यांची अर्थिक घडी विस्कटली
 
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे त्यांच्या पथकासह सातारा शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना सातारा शहरात लॉकडाउनच्या काळात दारूची विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. याची माहिती घेताना त्यांना 196 रविवार पेठ येथील एका घरातून व बंद गाळ्यात ठेवलेली चोरटी देशी व विदेशी दारूचा साठा सापडला. हा साठा कोणी आणला याची माहिती घेतली असता लॉकडाउनच्या काळात तानाजी बडेकर व अजय ऊर्फ पांड्या घाडगे (रा. 196, रविवार पेठ, सातारा) या दोघांनी जादा दराने दारूविक्रीसाठी आणल्याचे पुढे आले. त्यामुळे 50 हजार 798 रुपये किमतीचा हा दारूसाठा जप्त केला असून, संबंधितांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अरेरे ! शिरवळच्या नव्वदीतल्या आजीचा मृत्यू ; सातारा जिल्ह्यात 76 कोरोनाबाधितांची वाढ 

नऊ लाख 96 हजारांचा मुद्देमाल 

लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारू, गाड्या व इतर साहित्य असा तब्बल 9 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तानाजी आत्माराम शिंदे (वय 54, रा. वाकी, ता. जावळी), तानाजी नागनाथ मल्लाव (वय 31, रा. सोनगाव तर्फ सातारा), सुरेश नारायण पवार (वय 38, रा. रविवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत.

पुणेकरांनो, आताच बुकिंग करा

सातारा जिल्ह्यामध्ये लॉकडाउन सुरु झालेले. त्या पार्श्‍वभूमीवर दारूची बेकायदा वाहतूक होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक एन. एस. कदम व त्यांच्या पथकास दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सदरबझार तसेच माहुली हद्दीत परिसरात संशयितांवर कारवाई केली. कदम यांच्यासह हवालदार प्रशांत शेवाळे, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, अभय साबळे, किशोर तारळकर, गणेश घाडगे, विशाल धुमाळ हे या कारवाईत सहभागी होते.

Video : ऐका क्वारंटाइन वाल्यांची कथा 
 

पोलिस मुख्यालयाशेजारील मटण शॉपवर कारवाई

सातारा : लॉकडाउनच्या कालावधीत मटण दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्‍पाक गुलाब कुरेशी (वय 45, रा. रामाचा गोट) असे त्याचे नाव आहे. याबाबत हवालदार कर्णे यांनी फिर्याद नोंदविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामध्ये कोणतीही दुकाने उघडी ठेवण्यास बंदी आहे, तरीही कुरेश यांनी पोलिस मुख्यालयाशेजारील मशिदीजवळील कुरेशी मटण शॉप हे दुकान उघडे ठेवले होते. हवालदार दगडे तपास करत आहेत. 
संपादन - संजय शिंदे

त्या 'क्वारंटाइन' वाल्यांच्या कथेविषयी प्रशासन म्हणाले... 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.