राज्यात कोरोनाचा कहर; सहकारी संस्थांना सरकारकडून पाचव्यांदा मुदतवाढ; 30 एप्रिलपर्यंत निवडणुका लांबणीवर

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाउनच्या दिशेने पुन्हा वाटचाल सुरू झाल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सरकारने पुन्हा पाचव्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता 30 एप्रिलपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या संचालकांना आतापर्यंत एक वर्षापेक्षा जास्त मुदतवाढ मिळाली आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्याची निवडणूक प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशामुळे सुरूच राहणार आहे. 

सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्षभरापासून स्थगितीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सुरवातीला मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या लॉकडाउनमुळे तीन महिने पुढे ढकलल्या होत्या. त्यानंतर 17 जून, 28 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. त्यानंतर डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली गेली, तर त्यानंतर 16 मार्चच्या आदेशानुसार 31 मार्च 2021 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने शासनाने 16 जानेवारीचा आदेश रद्द करून पुन्हा सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार सातारा जिल्हा बॅंकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली. कच्ची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होते; पण कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबतचे आदेश कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतचे परिपत्रक लवकरच सहकार विभागाकडे पाठविले जाणार आहे. त्यामुळे ठरावांची प्रक्रिया पूर्ण झालेल्या जिल्हा बॅंकेसह इतर सहकारी संस्थांच्या संचालकांना पाचव्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मात्र, होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रकिया पूर्ण करावी लागणार आहे. वारंवार मुदतवाढ द्यावी लागली असल्याने सरकार योग्य त्या कायदेशीर सुधारणा करण्यात येणार असल्याचे सहकार खात्यातील सूत्रांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()