ठरलं! जिल्हा बॅंकेतून आमदार गोरेंचा पत्ता कट?; माण-खटावच्या नेत्यांची रामराजेंसोबत खलबत्तं!

Satara Latest Marathi Political News
Satara Latest Marathi Political News
Updated on

सातारा : सध्या साताऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन रणकंदन सुरु असून नेत्यांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माण, खटाव मतदारसंघातील भाजप व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी आज दुपारी सातारा शासकीय विश्रामगृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तंग झाले आहे. 

या भेटीदरम्यान आमदार जयकुमार गोरेंना जिल्हा बँकेत येण्यापासून रोखण्यासाठीची रणनिती आखण्यात आली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून मार्चमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे आगामी एक महिन्यात मी जिल्हा बँकेविषयी खळबळजनक गोष्ट घडविणार असल्याचे रामराजेंनी स्पष्टपणे सांगितल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आज साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. दुपारी माण-खटाव तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी रामराजेंची भेट घेतली. यामध्ये भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, बॅंकेचे संचालक अनिल देसाई तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळेंसह इतर नेते मंडळी उपस्थित होती. यावेळी सुमारे तासभर या नेत्यांशी रामराजेंनी चर्चा केली. माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना जिल्हा बँकेत येण्यापासून रोखण्यासाठीची रणनिती यावेळी ठरविण्यात आली. त्यामुळे यंदाची जिल्हा बॅंकेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.