गृहराज्यमंत्र्यांचा दे धक्का! साताऱ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : युवक संख्या आणि त्यांच्या सक्रियपणावर पक्षाचे भवितव्य ठरत असते. शिवसेना हा सर्वाधिक तरुणांना सामावून घेणारा, संधी देणारा पक्ष असून कार्यरत असणाऱ्या युवकांनी पक्ष मजबुतीसाठी सक्रिय होण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

सातारा येथे देसाई यांच्या उपस्थितीत पक्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अनिल गुजर, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, सचिन जवळ, उपतालुकाप्रमुख तानाजी चव्हाण, नंदू केसरकर, मोहन इंगळे आदी उपस्थित होते. 

या मेळाव्यादरम्यान 'मनसे'चे माजी शहरप्रमुख प्रणव सावंत, अमोल गोसावी, स्वप्नील चव्हाण, गुरुप्रसाद साठे, आतिश कदम, अक्षय गव्हाणे, सतीश इंदलकर, ओमकार गोसावी, अतुल लोंढे, राजेंद्र शेडगे, अक्षय गव्हाणे, अतुल पोपळकर, विशाल वाईकर, कार्तिक बारटक्के, सिध्दार्थ गोसावी, अंकुश गिरीगोसावी, अवधूत देव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर अक्षय जमदाडे, अर्जुन जमदाडे, प्रतीक जमदाडे, महेश जमदाडे, मंथन फाळके, किरण इंदलकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.