सातारा : माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाणार शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर आज शिवसेना सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. २०१९ च्या लोकसभेला नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेकडून लढवली होती. आज मुंबईतील एका कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केलेली आहे, तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीकास्त्र सोडले.
नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडताना काही आरोप केले. राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन दीड वर्ष झाले. तरीही अद्याप कामगारांचे प्रश्न कायम आहेत. कामगारांच्या प्रश्नासाठी अनेकदा वेळ माघूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बैठकीसाठी वेळ देत नाहीत. त्यामुळे आपण शिवसेना सोडत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटले.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार होते. नरेंद्र पाटील हे शिवसेनेत असले तरी प्रदीर्घ काळापासून त्यांचे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध अधिक निकटचे राहिले होते. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' तर केला. मात्र, आता ते राजकीय भूमिका काय घेणार याबाबत उत्सुकता आहे. दोनच दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांनी 'आपले साहेब, मुख्यमंत्री होणार, असे म्हणत एकमेकांची गळाभेट घेतली होती. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.