शिरवळ (जि. सातारा) : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमयरीत्या समसमान ९-९ मते पडल्याने सरपंच यांच्या निर्णायक मताद्वारे राष्ट्रवादी नाराज (बंडखोर), भाजप व शिवसेना गटाचे सुनील देशमुख यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार रिझवाना काझी या पराभूत झाल्या आहेत. (satara-political-news-shirval-ncp-candidate-lost-vice-president-election-shirwal-grampanchayat)
या पराभवामुळे राष्ट्रवादीला बहुमत असूनही येथे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीला धूळ चारली आहे. मात्र, या पराभवामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले व सभापती राजेंद्र तांबे यांच्या शिरवळवर असणाऱ्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे. विरोधी गटाने उपसरपंचपद आपल्या पारड्यात खेचून आणून शहर राष्ट्रवादीला जबरदस्त धक्कातंत्र दिला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी दर्शन काकडे यांच्या उपस्थितीत साेमवारी उपसरपंच निवड झाली. या वेळी ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी राष्ट्रवादीकडून रिझवाना काझी यांचा, तर भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी नाराज (बंडखोर) यांच्याकडून सुनील देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. मात्र, ठरलेल्या वेळेत अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली.
यामध्ये १७ ग्रामपंचायत सदस्य व सरपंच असे अठरा जणांनी मतदान प्रक्रियेत मतदान केले. या वेळी दोघांनाही समसमान ९-९ मते पडली. या वेळी सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी आपले मत सुनील देशमुख यांच्या पारड्यात टाकल्याने पुन्हा एकदा श्री. देशमुख उपसरपंच झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.