Phaltan Vidhan Sabha : फलटण मतदारसंघातला उमेदवार ठरला; अजित पवार यांनी केली 'या' नावाची घोषणा

Satara Politics Ajit Pawar : 'आमच्या घरात तात्यांच्या नंतर आबांनी राजकारण करायचं व आम्ही त्यांना मदत करायची, हे धोरण होते.'
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

''माझी शरद पवारांवर श्रद्धा आहे; कारण हा एकटा माणूस दिल्लीशी टक्कर घेत आला आहे. काही व्यक्ती वेगळ्या पद्धतीने राजकारण करत आहेत. ही या जिल्ह्याला लागलेली कीड आहे.’’

पिंपोडे बुद्रुक : आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच फलटण मतदारसंघातून (Phaltan Constituency) उमेदवार असतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करून त्यांना सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन केले. सोळशी (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाला; परंतु त्यांनी दूरध्वनीवरून बाळासाहेब सोळसकर यांच्या मोबाईलवरून उपस्थितांशी २० मिनिटे संवाद साधला.

यावेळी अजित पवार यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीत भगिनींसह सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन करत महिलांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले, तसेच पाणी प्रश्नही मार्गी लावला जाईल. शेतीचे वीजबिल माफी केली असल्याचं नमूद करून जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशील आहे, असेही सांगितले.

लवकरच उत्तर कोरेगाव तालुक्याचा दौरा करून तुमच्याशी संवाद साधेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सोळशी येथील सुमारे एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नितीन पाटील यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.

Ajit Pawar
हेलिकॉप्टर बैज्या-बुलेट छब्या बैलजोडीने जिंकली 22 लाखांची 'थार' गाडी; कोल्हापूरचा हरण्या ठरला ट्रॅक्टरचा मानकरी
 Phaltan constituency
Phaltan constituencyesakal

यावेळी आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोळशीची ग्रामपंचायत इमारत ही गावच्या वैभवात मानाचा तुरा असल्याचे सांगून रामराजे म्हणाले, ‘‘जिल्ह्याचा मला अभिमान आहे. बाहेर मी अभिमानाने साताऱ्याबद्दल बोलत असतो. मात्र, काही व्यक्ती या जिल्ह्यात अशा आहेत, त्यांना मी यावेळी पाडणारच. माझी शरद पवारांवर श्रद्धा आहे; कारण हा एकटा माणूस दिल्लीशी टक्कर घेत आला आहे. काही व्यक्ती वेगळ्या पद्धतीने राजकारण करत आहेत. ही या जिल्ह्याला लागलेली कीड आहे.’’

Ajit Pawar
BSP chief Mayawati : दलितांनो.. काँग्रेस-भाजपला नको, 'बसप'ला एकगठ्ठा मतदान करा; मायावतींचे आवाहन

यावेळी नितीन पाटील म्हणाले, ‘‘आमच्या घरात तात्यांच्या नंतर आबांनी राजकारण करायचं व आम्ही त्यांना मदत करायची, हे धोरण होते; पण अजित पवार मला खासदारकीबद्दल बोलले. त्यांनी तो शब्द खरा केला. त्यांनी किसन वीर आणि खंडाळा कारखान्याला मदत केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने वाचले. मागील संचालकांच्या धोरणामुळे किसन वीर अडचणीत आला. मात्र, अजित पवारांनी आम्हाला ४६७ कोटी रुपये दिल्याने हे दोन्ही कारखाने प्रगतिपथावर आहेत. शेतकऱ्यांची देणीही देता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.