Udayanraje Bhosale : सगळं आताच उघड केलं तर कसं होणार? लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणुकीबाबत सावध भूमिका घेतलीये
Udayanraje Bhosale News
Udayanraje Bhosale Newsesakal
Updated on
Summary

'शंभूराज देसाई दुष्काळी भागात गेले नाहीत हा भाग नाही; पण ठपका ठेवायचा म्हणून ते गेले नाहीत म्हटले जाते.'

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सातारा मतदारसंघातून (Satara Constituency) अनेक जण इच्छुक आहेत. याबाबत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मात्र, सावध भूमिका घेतली आहे.

या विषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता मी आताच सगळे उघड केले तर कसे होणार. लोकांचा आग्रह असतो. तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार भोसले यांनी काल सातारा शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

Udayanraje Bhosale News
साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचं होणार भव्य स्मारक; संस्थेचं अध्यक्षपद उदयनराजेंकडे, शासनाकडून 'इतके' कोटी मंजूर

या वेळी त्यांनी सातारा लोकसभेच्या निवडणुकीसह सातारा शहरातील विविध विकासकामे व गड किल्ल्यांच्या संवर्धनावर भाष्य केले. उदयनराजे म्हणाले, ‘‘सातारा शहराच्या विकासाचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी केली. या स्मारकासाठी १६ कोटी मंजूर असून, आतापर्यंत आठ कोटी मिळाले आहेत. काम पूर्ण झाल्यावर उर्वरित आठ कोठी शासनाकडून मिळतील.

Udayanraje Bhosale News
दोन्ही राजेंमधला वाद मिटला? उदयनराजे-रामराजे एकमेकांच्या शेजारी बसले अन् हास्यविनोदातही रमले, अनेकांच्या उंचावल्या भुवया

हुतात्मा कर्नल संतोष महाडिक स्मारकाचे काम सुरू असून, त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर आहे. त्यापैकी दीड कोटी उपलब्ध झाले असून, स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहेत. उर्वरित एक कोटी शासनाकडून येणे बाकी आहे. या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते उद्‌घाटन घेण्याचा प्रयत्न आहे.’’

सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीबाबतच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘सगळेच आताच उघड केले तर कसे होणार. लोकांचा आग्रह असतो, तो पण लक्षात घेतला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

Udayanraje Bhosale News
Hasan Mushrif : शरद पवार कोल्हापुरात येताच मुश्रीफांच्या डोळ्यात पाणी; म्हणाले, 'आम्ही पवार साहेबांसोबत नाही याचं दुःख होतंय'

रोहित पवारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केलेल्या टीकेवर ते म्हणाले, ‘‘शंभूराज देसाई दुष्काळी भागात गेले नाहीत हा भाग नाही; पण ठपका ठेवायचा म्हणून ते गेले नाहीत म्हटले जाते. त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापले काम करतात. आता आम्ही कामे केलीत, म्हणून सगळे येऊन बघतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()