खटाव (सातारा) : खटाव-पुसेगाव रोडलगत शिंदेवस्ती शिवारात विनय माने यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला (jackal) वनविभागाच्या पथकाने (forest department) स्थानिकांच्या मदतीने जीवदान दिले. ३० फूट खोल विहिरीत उतरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्सी व पोत्याच्या साह्याने कोल्ह्याला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. (satara positive news forest department saved life of jackal fallen in river khatav)
खटावातील शेतकरी विनय माने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडला होता.
येथील शेतकरी विनय माने (Farmer Vinay Mane) यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडला होता. माने आपल्या मुलांना घेऊन नेहमीप्रमाणे आंघोळीला आले असता, त्यांच्या कन्येला हा कोल्हा दिसला. याची माने यांनी तत्काळ माहिती वनविभागाला दिली. यानंतर वनविभाग तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तद्नंतर दोरी व पोते घेऊन स्थानिकांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून कोल्ह्याला केवळ पंधरा मिनिटांतच सुरक्षितपणे बाहेर काढले.
वनक्षेत्रपाल शीतल पुंदे (Forester Sheetal Punde) म्हणाल्या, पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात अंधारामध्ये विहिर न दिसल्याने कोल्हा विहिरीत पडला होता. या कोल्ह्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अलिकडे भक्षाच्या वा पाण्याच्या शोधात वन्यप्राणी विहिरीमध्ये पडण्याच्या घटना घडत आहेत. स्थानिकांनी अशा बाबतीत वन्यप्राण्यांना इजा न करता वनविभागाशी त्वरित संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कामी वनरक्षक संभाजी दहिफळे, वनमजूर बबन जाधव, संजय बनसोडे यांचा सहभाग होता. तसेच येथील स्थानिक ग्रामस्थ आबासाहेब काटकर, राजेश माने, विजय मोरे यांनी देखील विशेष सहकार्य केल्याची माहिती पुंदे यांनी दिली.
satara positive news forest department saved life of jackal fallen in river khatav
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.