साताऱ्यात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन; खासगीकरणाला विरोध

केंद्र सरकारने चार राष्‍ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्‍याचा निर्णय घेतला.
Bank Employee Protest
Bank Employee ProtestSakal
Updated on

सातारा : राष्‍ट्रीयीकृत बँकांचे (Nationalize Banks) खासगीकरण करण्‍याच्‍या केंद्र सरकारने (Central Government) घेतलेल्‍या निर्णयास विरोध दर्शविण्‍यासाठी आज युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्‍यावतीने पुकारलेल्‍या आंदोलनात (Protest) जिल्‍हाभरातील राष्‍ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनावेळी राष्‍ट्रीय संपत्तीचा होणारा लिलाव रोखण्‍यासाठी आंदोलनात जनतेने सहभागी होण्‍याचे आवाहन करण्‍यात आले.

केंद्र सरकारने चार राष्‍ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्‍याचा निर्णय घेतला असून, त्‍यासाठीचे विधेयक संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्‍यात येणार आहे. या निर्णयास विरोध दर्शविण्‍यासाठी हे आंदोलन युनायटेड फोरमच्‍यावतीने सुरु करण्‍यात आले आहे. याबाबतच्‍या निवेदनात म्‍हटले आहे, कि १९६९ रोजी दुरद्दष्‍टी ठेवत तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ बँकांचे राष्‍ट्रीयीकरण केले.

Bank Employee Protest
राज्यात ओबीसी लोकसंख्या ४० टक्के?

त्‍यांच्‍या या निर्णयाचा फायदा तळगाळातील समाजाला झाला व त्‍यांचा आर्थिकस्‍तर यामुळे उंचावला. अलीकडच्‍या काळात केंद्र सरकारने राष्‍ट्रीयीकृत बँका खासगीकरण्‍याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्‍य कष्‍टकरी जनता बँकींग सुविधेपासून वंचीत राहणार असुन, त्‍याचा फटका समाजाच्‍या आर्थिक प्रगतीस बसणार आहे.

खासगीकरणामुळे संबंधित गुंतवणूकदार स्‍वत:चा फायदा वसुल करण्‍यासाठी बँकेच्‍या प्राथमिक सुविधांचे दर वाढवेल आणि सर्वसामान्‍य जनतेला बँकांची दारे बंद होतील. हे टाळण्‍यासाठी हे आंदोलन करण्‍यात येत असल्‍याचेही निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.