Khandala : बाळूमामाचं दर्शन घेऊन येणाऱ्या गाडीला भीषण अपघात; मायलेक जागीच ठार, पाच जण जखमी

पारगाव (ता. खंडाळा ) गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव आलेल्या कारनं पाठीमागून धडक दिली.
Satara-Pune National Highway Car Accident
Satara-Pune National Highway Car Accidentesakal
Updated on

खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Satara-Pune National Highway) पारगाव (ता. खंडाळा ) गावच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव आलेल्या कारनं पाठीमागून धडक दिली. या अपघातात (Car Accident) मायलेक दोघेजण जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी झाले.

याबाबत खंडाळा पोलिसांकडून (Khandala Police) मिळालेल्या माहितीनुसार, साताराकडून पुणे बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर पारगाव या ठिकाणी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाळूमामाचं दर्शन घेऊन येणारी मारुती कार (क्रमांक एमएच 13 एन 3154) ही ट्रकला (क्रमांक एम एच 43 वाय 4659) पाठीमागून धडकल्यानं अपघात होऊन, त्यामध्ये कारमधील एक महिला व पंधरा वर्षाचा मुलगा असे दोघेजण जागीच ठार झाले व पाच जण जखमी झाले आहेत.

Satara-Pune National Highway Car Accident
Supreme Court च्या निर्णयावर गौतम अदानींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, सत्याचा विजय होईल..

अपघाताची माहिती मिळताच, खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे व खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी मानसी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं. मृतांमध्ये कांचन चंद्रकांत वनशिवे (वय 30), वीरेंद्र चंद्रकांत वनशिवे (वय 10) रा. वडगाव रासोई (ता. शिरूर, जि. पुणे) यांचा तर जखमींमध्ये कार चालक संकेत भिमाजी चौधरी (वय 22), अनिल मुक्ताराम कुलथे (वय 55), अंजली अनिल कुलथे (वय 50), आराध्या अनिल कुलथे (वय 7) ही सर्व रा. वडगाव रासाई ता. शिरूर जि. पुणे, तसंच स्नेहल पांडुरंग कुलथे (वय 42) रा. अकोला ( ता. जि. अकोला) यांचा समावेश आहे. याबाबत संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Satara-Pune National Highway Car Accident
Assembly Election : PM मोदींचं 'ते' भाकित खरं ठरलं; त्रिपुरासह 'या' राज्यांत भाजपला झाला मोठा फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.